Bhumika Temple Goa: साखळेश्वर देवस्थानाचा वाद शमला; भक्तांसाठी मंदिराचा तर वाहतुकीसाठी पर्ये-साखळीचा मार्ग मोकळा

Bhumika Temple Goa Issue: प्रकरण चिघळल्यामुळे यावर उपाय करण्यासाठी वाळपई, सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतण्यात आली
Bhumika Temple Goa Issue: प्रकरण चिघळल्यामुळे यावर उपाय करण्यासाठी वाळपई, सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतण्यात आली
Bhumika Temple Goa Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पर्ये सत्तरी: पर्ये येथील श्री भूमिका देवस्थानचा राखणदार म्हणून परिचित असलेल्या साखळेश्वर देवस्थानात माजिक बांधवांनी एकतर्फी पूजा केल्याने वाद उद्‍भवला होता, परिणामी पर्ये-साखळीच्या मार्ग आंदोलकांकडून बंद ठेवण्यात आला होता. हे प्रकरण चिघळल्यामुळे वेळीच यावर उपाय करण्यासाठी वाळपई, सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (२१ डिसेंबर) रोजी बैठक घेतण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, मामलेतदार तसेच इतरांची उपस्थिती होती.

चर्चेत झालेल्या निर्णयानुसार धार्मिक विधीसाठी २१ व २२ डिसेंबर रोजी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे तसेच पुढील आदेशापर्यंत मदिर खुले राहील असा आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलाय.

Bhumika Temple Goa Issue: प्रकरण चिघळल्यामुळे यावर उपाय करण्यासाठी वाळपई, सत्तरी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतण्यात आली
Bhumika Temple Goa: साखळेश्वर देवस्थान वादाचा फटका, चोर्ला घाट मार्गावर प्रवाशांचा खोळंबा

पर्ये उत्सवाला मान्यता दिल्याने लोकांचा उठाव देखील शमला असल्याने साखळी-पर्ये रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

वाद शमल्याने शनिवारी संध्याकाळी मंदिरात पूजा केली जाईल आणि यानंतर उत्सवातील भजन कीर्तनेचे कार्यक्रम देखील सुरु होतील. गावकर घोलकर व राणे बांधवांनी शुक्रवारी (२० डिसेंबर) दुपारी वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून परस्पर पहाटे पूजा करणाऱ्या चौघांच्या अटकेची मागणी केली होती. उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशान्वये वाळपई पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल केले होते मात्र आता वाद शमल्याने ही तक्रार देखील मागे घेण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Casino Director Shooting Case
Why 1980s Are Trending in India
Mahikavati Bakhar History
PCB Takes Players Mobile Phones
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com