Pooja Naik Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik Case: लाखोंचा गंडा घालणाऱ्या पूजा नाईकला कोर्टाचा झटका; सुनावली न्यायालयीन कोठडी!

Cash For Job Scam: न्यायालयाने पूजाला मोठा झटका दिला. न्यायालयाने आता पूजाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पूजाने लाखोंचा गंडा घातला.

Manish Jadhav

कॅश फॉर जॉब प्रकरणी पूजा नाईकच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. पूजाच्या बाबतीत रोज नव-नवे खुलासे होत आहेत. याचदरम्यान न्यायालयाने पूजाला मोठा झटका दिला. न्यायालयाने आता पूजाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पूजाने अनेकांना लाखोंचा गंडा घातला.

तत्पूर्वी, केरी-फोंडा येथील श्रीधर सतरकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पूजाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आता न्यायालयाने पूजाला न्यायालयीन कोठडी सुनावली. सतरकर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी पूजाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

दरम्यान, पूजाच्या सरकारी नोकरीच्या जाळ्यात सुमारे शंभरजण अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पूजाने या कामासाठी काही गावांमध्ये एजंट ठेवले होते. त्या एजंटांमार्फत ती पैसे घेत होती.

राजकीय वादंग

राज्यात सध्या पूजा, दीपश्री आणि प्रिया या महिलांचीच चर्चा सुरु आहे. या प्रकरणावरुन विरोधकही आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात सावंत सरकारमधील मंत्री, आमदार यांचाही यात हात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. विरोधक सातत्याने या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची मागणी करत आहेत. दुसरीकडे मात्र सावंत सरकार पोलीस चौकशीवर भर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT