Pooja Naik Case Suspect Officer Commits Suicide
पूजा नाईक प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात पूजाला मदत करणाऱ्या एका सरकारी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी, या प्रकरणात पूजाला दोन सरकारी अधिकारी मदत करत असल्याचे समोर आले होते. श्रीधर सतरकर असे या आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. सरकारी नोकरी घोटाळ्यातील संशयितापैकी तो एक होता. सतरकर चौकशीनंतर बेपत्ता होता.
दरम्यान, या दोन सरकारी अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी हा निवृत्त झाला आहे, तर एकजण अजूनही सरकारी सेवेत आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे संशयित पूजा नाईकशी लागेबांधे असल्याचे समोर आले होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत या दोन संशयित अधिकाऱ्यांची चौकशी होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.
सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी पूजा नाईक हिला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने 20 हजार रुपयांची हमी आणि अन्य अटींवर सशर्त जामीन मंजूर केला, मात्र या अटींची पूर्तता करेपर्यंत तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत नऊ जणांना ताब्यात घेतले असून, अजून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश देखील या प्रकरणात समावेश उघड झाल्याने काही मंत्र्यांची देखील नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून, काही मंत्र्यांचे धाबे दणाणले आहेत.
नोकऱ्या देण्याच्या बहाण्याने प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांना गंडा घातल्याच्या प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिच्या ताब्यातील चार महागड्या कारगाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच ती राहत असलेल्या ओल्ड गोव्यातील पॉश कॉलनीमध्ये जाऊन चौकशी सुरु केली आहे. एकदम साधी राहणीमान आणि पतीचा मासळी विक्रीचा व्यवसाय असूनसुद्धा तिच्याकडे चार प्लॅट असल्याची बाब समोर आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.