gava animal Dainik Gomantak
गोवा

Ponda News : गव्याच्या हल्ल्यात केरीतील महिला जखमी, शेती-बागायतीचेही केले नुकसान

केरी-फोंडा येथील प्रकार : पायाला गंभीर दुखापत; पडले 21 टाके

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा तालुक्यातील केरी गावातील पालसरेवाड्यावरील निशा तुकाराम सतरकर ही महिला गव्‍याच्‍या हल्ल्यात जखमी झाली. त्‍यांच्‍या पायाला जबर दुखापत झाली असून 21 टाके पडले आहेत.

ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या भागात गव्यांचा मुक्त संचार असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

केरी गावातील आमाडी व पालसरे या वाड्यावर गव्यांचे वास्तव्य आहे. या भागातील बागायतदारांनी काबाडकष्ट करून लागवड केलेल्या पिकांची वारंवार गव्यांकडून नासाडी केली जाते.

पिकांची नासधूस होत असल्याने बागायतदारांना मोठे नुकसान होते. हा भाग कुळागर व बागायतीने नटलेला असल्याने कुळागरी पीक हेच येथील काही लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.

आमाडी ते पालसरे या रस्त्यावरही गवे सर्रासपणे फिरताना लोकांच्या नजरेस पडले आहेत. काल घडलेल्या घटनेमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन खात्याने गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी, स्थानिकांशी केली आहे.

बहीण सुमनने वाचविला निशाचा जीव

निशा आणि त्‍यांची बहीण सुमन ही पालसरे येथील डोंगराळ भागात अळंबी शोधण्यासाठी गेल्‍या होत्‍या. त्यांच्यासोबत तीन कुत्रेही होते. कुत्र्यांना गव्‍याचा वास लागताच ते त्‍याच्‍यासमोर उभे ठाकले. पण गव्‍यापुढे कुत्र्यांचे काही चालले नाही.

त्‍याने कुत्र्यांचा पाठलाग केला. दोन कुत्रे विरुद्ध बाजूने पळाले तर एक कुत्रा निशा यांच्‍या‍जवळ येताच गव्याने निशा यांच्‍या पायावर शिंग मारले व त्‍यांना सुमारे तीन मीटर अंतर फरफटत नेले. त्‍यांच्‍या बहिणीने सुमनने प्रसंगावधान दाखवत हातात कोयता घेऊन गव्याला धाक दाखविला.

त्याबरोबर गवा तिथून निघून गेला. सुमनने दाखविलेल्या धैर्यामुळेच निशा यांचा जीव वाचला. पण त्‍यांच्‍या पायाला जखम झालीच. नंतर त्‍यांना बेतकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता २१ टाके घालण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT