Goa Land Grabbing Case: जमीन हडप चौकशीत 47 पैकी 2 प्रकरणे बंद

वर्ष उलटले तरी प्रकरणाचा तपास सुरूच
Land Grabbing Case
Land Grabbing CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राज्यातील जमीन हडप प्रकरणीच्या तपासकामासाठी सरकारने क्राईम ब्रँचमध्ये विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केल्यानंतर 47 गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला.

हे पथक स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले तरी 47 पैकी दोन प्रकरणे बंद करण्यात आली आहेत, तर इतर प्रकरणांचा तपास सुरू आहे.

या प्रकरणांच्या तपासणी सरकारने एकसदस्यीय आयोग नेमला आहे. मात्र या जमीन हडपप्रकरणीची चौकशी अजूनही रेंगाळत आहे.

पाच वर्षात जमीन हडप प्रकरणांची माहिती तसेच नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यासाठी आमदार वेंझी व्हिएगश यांनी विधानसभेत प्रश्‍न केला होता. त्यावर गृहमंत्री डॉ. सावंत यांनी लेखी दिलेल्या उत्तरात आतापर्यंत एसआयटीकडे 47 प्रकरणे नोंद झाली आहेत.

Land Grabbing Case
Goa Congress : वनमंत्री, सरकार लोकांचा आवाज दाबण्यासाठी ‘हक्कभंगाचा’ वापर करत आहे : अमित पाटकर

त्यातील आठ प्रकरणांपैकी एक कोणताही पुरावे न सापडल्याने बंद करण्यात आले आहे तर संदीप वझरकर यांच्याविरुद्ध एक प्रकरण उच्च न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतर तो तपास बंद करण्यात आला आहे.

मात्र पर्वरी पोलिस स्थानकात नोंद असलेल्या प्रकरणात वझरकर यांच्याविरुद्धच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Enemy Property Case Goa
Mapusa Kidnapping Cases 2026
Goa Police Srinivas Naik Investigation
Goa Land Grabbing Special Court
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com