Goa Crime, Court Order Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पत्नीच्या वागणुकीवर आला संशय, पतीने डोक्यात घातला दगड; संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल

Goa Murder Case: सरकारी पक्षाने केलेल्या दाव्यानुसार, ३१ मे २०२५ रोजी संध्याकाळी चेतन गावकर याने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यावर दगडाने दोन वार करून तिची हत्या केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फोंडा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिरवाडा-फोंडा येथील गाजलेल्या पत्नी हत्या प्रकरणातील संशयित आरोपी चेतन गावकर (३४) याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मे २०२५ मध्ये घडलेल्या या घटनेत पुराव्यांचे प्राथमिक मूल्यमापन केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश बोस्को रॉबर्ट्स यांनी हा निर्णय दिला.

सरकारी पक्षाने केलेल्या दाव्यानुसार, ३१ मे २०२५ रोजी संध्याकाळी चेतन गावकर याने झोपेत असलेल्या आपल्या पत्नीच्या डोक्यावर दगडाने दोन वार करून तिची हत्या केली होती.

कौटुंबिक वादातून आणि पत्नीच्या वागणुकीवर संशय असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर आरोपीने स्वतः फोंडा पोलीस स्थानकात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली होती आणि घराच्या चाव्या पोलिसांकडे सोपवल्या होत्या.

ही घटना रागाच्या भरात घडली आहे, त्यामुळे हा ''खून'' नसून ''सदोष मनुष्यवध'' मानला जावा असा दावा बचाव पक्षातर्फे करण्यात आला होता. न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. न्यायमूर्तींनी नमूद केले की, संशयिताला पत्नीच्या वागणुकीबद्दल वर्षभरापासून माहिती होती, त्यामुळे ही घटना ''अचानक उद्भवलेला राग'' नसून नियोजनबद्धरीत्या केलेले कृत्य असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT