Goa Crime: जुगाराच्या व्यसनामुळे पत्नी गेली सोडून, पतीने केला लोखंडी रॉडने हल्ला; आरोपातून वगळण्याचा अर्ज कोर्टाने फेटाळला

Ravanfond Crime: पत्नीचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून वगळण्याची संशयित अहमद शेख याचा अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
Goa Crime, Court Order
Goa Crime, Court OrderDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पत्नीचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून वगळण्याची संशयित अहमद शेख याचा अर्ज दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

फेब्रुवारी २०२१ साली रावणफोंड येथे अहमद शेख याने आपली पत्नी साजिदा हिच्यावर लोखंडी दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. दोघेही पती पत्नी भाटले, पणजी येथे राहत होती. अहमद हा व्यवसायाने टॅक्सी चालक आहे. त्याला जुगार खेळण्याचा नाद लागला होता.

त्याला कंटाळून साजिदा कायमची मडगावात राहण्यासाठी आली होती. तिचा शोध घेत तो मडगावला आला असता, रावणफोंड येथे ती दुचाकीवरून नावेलीच्या दिशेने जात असताना अहमदला दिसली. तिला वाटेत अडवून त्याने तिच्यावर लोखंडी दांड्याने हल्ला केला. यात साजिदा गंभीर जखमी झाल्या होत्या.

Goa Crime, Court Order
Goa Crime: कार अडवून केली मारहाण, शिवीगाळ! बड्डेत धारदार शस्त्रे घेऊन रस्त्यावर दंगा; 5 संशयित ठरले दोषी

मागाहून या प्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित अहमद याच्याविरोधात बेकायदा अडवणे, मारण्याची धमकी देणे, शस्त्राने दुखापत करणे व खुनाचा प्रयत्न करणे अशा कलमांखाली गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. सध्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

Goa Crime, Court Order
Goa Crime: कळंगुट हादरलं! 15 वर्षांपासून काम करणाऱ्या केअरटेकरची फावड्याने वार करुन निर्घुण हत्या; संशयित पोलिसांच्या ताब्यात

आतापर्यंतच्या सुनावणीत पीडितेचा जबाब, सादर करण्यात आलेले पुरावे व पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र यांचा विचार करत संशयिताविरोधात कोणताही गुन्हा नाही, असे म्हणता येणार नाही, असे निरिक्षण नोंदवून संशयिताचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com