Ponda News  Dainik Gomantak
गोवा

Ponda News : फोंडा ग्रामीण भागांत पावसाने दैना; रस्त्यांवर तुंबले पाणी

पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला जात नसल्यामुळे त्याचाही नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. यामुळे प्रवास करणे ही जिकिरीचे बनले आहे.

दैनिक गोमन्तक

Ponda : गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे फोंडा तालुक्यातील ग्रामीण भागात दैना उडाली असून लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले असल्यामुळे वाहन चालवणेही कठीण होत आहे. बऱ्याच भागात वीज खात्याच्या भूमिगत वाहिन्या घालण्याकरता चर खोदण्यात आले असून ते नीट बुजवले नसल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून त्याला ‘तळ्याचे’ स्वरूप प्राप्त झालेले दिसत आहे.

या तळ्यांतून वाहने चालवणे दुरापास्त होत असून त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळू लागले आहे. काही ठिकाणी वाटेतच झाडे पडल्यामुळे त्याचा ही त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला जात नसल्यामुळे त्याचाही नागरिकांना त्रास भोगावा लागत आहे. यामुळे प्रवास करणे ही जिकिरीचे बनले आहे. या सगळ्या समस्यांचे प्रमुख कारण म्हणून लोक नियोजनातल्या त्रुटींकडे बोट दाखवताना दिसतात.

पावसाळा तसा दरवर्षी येतच असतो त्यामुळे पावसाळापूर्व नियोजन करणे आवश्यक असते. पण ही गोष्ट कुणीही गंभीरपणे घेताना दिसत नाही. त्यामुळे पंचायती वा नगरपालिका याबाबतीत दक्ष दिसत नाहीत. त्याचाच परिणाम मग पावसाळ्यात सामान्यांना भोगावा लागतो. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे लोकांना आता या परिणामांना तोंड द्यावे लागणार हे निश्चित आहे. त्यात परत साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली असून मलेरिया, डेंग्यू सारख्या घातक रोगांची भीती सतावू लागली आहे. गेल्यावर्षी या भागातील अनेकांना या जीवघेण्या रोगांची लागण झाली होती.

दुचाकीस्वारांना दुखण्यांचा ताप

गेल्या वर्षी पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडले होते. आणि त्यामुळे त्यांना कंबरदुखीचे विकार जडले होते. अजूनही त्यांना परिणाम भोगावे लागत आहेत. आता पुन्हा खड्ड्यांतून जावे लागत असल्यामुळे पुढे काय वाढून ठेवले आहे,या धास्तीने अनेक दुचाकीस्वार त्रस्त असून त्यांना खड्ड्यांमुळे दुखणे वाढू शकते, अशी भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT