Bicholim News : सम्राट संगीत सितारा’ स्‍पर्धेची महाअंतिम फेरी 22 जुलैला; यंदा 18 वे पर्व

२ जुलैला प्रारंभ; १४ ते ३५ वयोगटातील स्पर्धकांना संधी
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim : सम्राट क्लब इंटरनॅशनल-राज्य एकतर्फे घेण्यात येणाऱ्या ‘सम्राट संगीत सितारा : २०२३’ स्पर्धेचे अठरावे पर्व यंदा २ जुलैपासून सुरू होत आहे. २२ जुलै रोजी महाअंतिम सोहळा रंगणार आहे. डिचोलीचे सुपुत्र आणि प्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे हे या स्पर्धेचे महागुरू आहेत, अशी माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संयोजक रवींद्र पणजीकर, सचिव अविन नाईक, सहसचिव काजल चोडणकर, यदुनाथ शिरोडकर, राजमोहन शेट्ये आणि मंगल हळदणकर उपस्थित होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार दि. २ जुलै रोजी दोन केंद्रांवर होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता माशेल येथे व संध्याकाळी ४.३० वाजता बोरी येथे ही फेरी होईल. २५ जूनपर्यंत सहभागी स्पर्धकांनी त्यांना पाहिजे असलेल्या केंद्रावर नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धक आपल्या नजीकच्या सम्राट क्लबशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करू शकतात.

Bicholim News
Passports: दहा वर्षात 70,000 भारतीयांनी केले पासपोर्टचे आत्मसमर्पण; गोवा, पंजाब आघाडीवर

१४ ते ३५ वर्षे वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रवेश विनामूल्य असून हिंदी, मराठी किंवा कोकणी भाषेतून स्पर्धक आपली कला सादर करू शकतील, अशी माहिती आयोजकांनी दिली. सम्राट संगीत सितारा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य करावे. असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Bicholim News
Goa News : अंमली पदार्थविरोधी कारवाया वाढल्‍या, गुन्‍हे घटले; मुख्‍यमंत्र्यांचा दावा

उपांत्य फेरीसाठी १२ स्पर्धक

उपांत्य फेरीसाठी १२ स्पर्धक निवडले जातील. पाटो-पणजी येथील कला व संस्कृती खात्याच्या सभागृहात १६ जुलै रोजी उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होईल व एकूण १२ स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी ६ स्पर्धक निवडले जातील. स्पर्धेची महाअंतिम फेरी २२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता म्हापसा येथील श्री बोडगेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com