Goa News : आला पावसाळा, आरोग्य सांभाळा; दवाखान्यात सर्दी, तापाचे वाढले रुग्ण

विषाणूजन्य आजारांना सुरुवात, काळजी घेण्याचे आवाहन
Goa Dengue Cases
Goa Dengue CasesDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात उशिरा का होईना, माॅन्सूनला सुरुवात झाली असून आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. परंतु पावसाळ्यात पाण्यात होणारे बदल, हवामान, मंदावलेली पचनशक्ती, डासांच्या उत्पत्तीत झालेली वाढ यामुळे अनेक साथीचे आजार बळावतात.

पावसासोबतच सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी, ताप, तसेच इतर विषाणूजन्य आजारांना देखील सुरुवात झाली आहे. राज्यातील लहान-मुले, ज्‍येष्ठ नागरिक आदी आजाराने ग्रस्त आहेत.

आपला परिसर स्वच्छ ठेवा

आपल्या सभोवताली असलेली अस्वच्छता हे देखील आजाराचे एक प्रमुख कारण असून आपल्या परिसरातील पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही.

Goa Dengue Cases
Passports: दहा वर्षात 70,000 भारतीयांनी केले पासपोर्टचे आत्मसमर्पण; गोवा, पंजाब आघाडीवर

अशी घ्या काळजी

  • घरासमोर पाणी साचू देऊ नका, घर व परिसर स्वच्छ ठेवा.

  • पाण्याचे टॅंक तथा बॅरेल स्वच्छ ठेवा, टॅंक उघडे ठेवू नका.

  • सायंकाळी दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवाव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.

  • गरम पाणी प्या, तेलकट पदार्थ टाळा.

साथीच्या आजाराची लक्षणे

  • सर्दी, ताप आणि वारंवार खोकला येतो.

  • अंगावर लहान-लहान पुरळ येतात.

  • जेवल्यावर अथवा जेवण केलेले नसतानाही उलट्या, मळमळ होते.

  • रक्तातील प्लेटलेट्‌स कमी होऊन अशक्त‌पणा जाणवतो.

Goa Dengue Cases
Mumbai Goa Vande Bharat Train Flagg Off: ...अन् मडगाव येथून मुंबईच्या दिशेन धावली 'वंदे भारत' ट्रेन

"सध्या हवामानातील बदलांमुळे साथीच्या आजारांत वाढ झाली असून एरव्ही २ ते ३ दिवसात बरा होणार आजार आताचा व्हारयस ४ ते ५ दिवस राहत आहे. अनेकांना कोविड-१९ची देखील भिती वाटत आहे. परंतु शक्यतो आता कोविड -१९ नंतर सामान्य व्हायरल आजार होत आहे. त्यामुळे आजाराच्या लक्षणांच्या अनुषंगाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी तसेच आराम करावा."

डॉ. व्यंकटेश हेगडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com