Ponda by election Dainik Gomatnak
गोवा

Ponda By Election: फोंड्यात प्रचाराच्या तोफांची होणार सरबत्ती! काँग्रेसकडून भाटीकर आघाडीवर; भाजपकडून रितेश, दळवींची नावे चर्चेत

Ponda By Election 2026: ‘आप’ आणि ‘आरजी’वाले थंड आहेत. अर्थातच ‘आप’वाल्यांना अजून उमेदवार सापडलेला नाही तर ‘आरजी’वाल्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ होणार आहे. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असेच वातावरण असून ‘आप’ आणि ‘आरजी’वाले थंड आहेत. अर्थातच ‘आप’वाल्यांना अजून उमेदवार सापडलेला नाही तर ‘आरजी’वाल्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर सध्या तरी ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून केतन भाटीकर यांचे नाव सर्वांत पुढे आहे. अर्थातच रवी नाईक यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर फोंड्यात काँग्रेस कुणी राखली असेल तर ती राजेश वेरेकर यांनी हे कुणीही मान्य करील. मात्र, डॉ. केतन भाटीकर यांचा वाढता प्रभाव पाहून काँग्रेसवाल्यांनी भाटीकर यांना फोंड्यातून तिकीट देण्याचे निश्‍चित केले आहे.

आता भाटीकर यांना तिकीट देण्यात राजेश वेरेकर यांचा विरोध नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठी जे सांगतील ते आपण करणार असून भाटीकर यांना आपला पाठिंबा असेल, असे राजेश वेरेकर यांनी जाहीर केल्यामुळे सध्या तरी भाटीकर यांचा मार्ग निर्धोक बनला आहे. फोंडा पोटनिवडणुकीवरून भाजप गोटात सध्या तरी चलबिचल सुरू आहे.

भाजपने रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक आणि भाजपचे एक पदाधिकारी विश्‍वनाथ ऊर्फ अपूर्व दळवी अशी दोघांची नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यात कुणा एकाची निवड होणार आहे; पण पूर्ण भाजप टीम विजयासाठी एकत्रित काम करील काय, हा खरा प्रश्‍न आहे. एकापरीने भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी फोंड्याची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

कोणत्याही स्थितीत फोंडा जिंकायलाच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष काम करीत आहेत. अर्थातच त्यांच्या फोंडावाऱ्याही वाढल्या आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते.

फोंड्यात बहुजनांची मते जास्त...

फोंड्यात बहुजन समाजाची मते सर्वात जास्त आहेत. अर्थातच भंडारी समाजाची मते त्यात सर्वाधिक आहेत. फोंडा मतदारसंघात साधारण साठ टक्के भंडारी समाजाची मते आहेत. मागचा फोंड्याचा जर इतिहास पाहिला तर भंडारी समाजाने फोंडा पोटनिवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे याही वेळेला भंडारी आणि बहुजन समाजाचा निर्णय हा शेवटचा असेल, ज्याला भंडारी समाजाची अनुकूलता आहे, तोच निवडून येणार हे नक्की.

मुख्यमंत्री घेताहेत आढावा!

भाजपला फोंड्याची निवडणूक जिंकायचीच आहे, त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सातत्याने फोंड्याचा आढावा घेत आहेत. दर दिवसाआड बैठका होत आहेत, त्याला मुख्यमंत्री मार्गदर्शन करीत आहेत. मतदारसंघात भाजप कुठे कमी आहे, त्याचा आढावा घेताना ही कमतरता कशी भरून काढायची यासंबंधी हा आढावा आहे. फोंड्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. मागच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपला मते पडली नाहीत, त्या जागा सध्या भाजपने टार्गेट केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ganeshotsav: गोव्यात 77 हजार गणेशमूर्तींची नोंद; तब्बल 22,886 मूर्तींमध्ये 'POP', पर्यावरण खात्याच्या पोर्टलवरील आकडेवारी समोर

Bengaluru Crime: 24 वर्षांचा आनंद अवघ्या 4 महिन्यात विरला, पोटच्या जुळ्या मुलींची आईनेच केली हत्या; बंगळुरुतील घटनेनं हादरला देश

Goa Law And Order: आकड्यांचा सलाम!

Goans Surrender Passports: रोज सरासरी 5 गोमंतकीय पासपोर्ट करतात सरेंडर; 3.5 वर्षांत तब्बल 6,960 जणांनी पासपोर्ट सोडला

Diamond Robbery: 380000000 चा 200 कॅरेटचा हिऱ्यांचा हार लंपास, 95 वर्षांचा शाही इतिहास! ऑस्ट्रियातील घटनेनं खळबळ; इंटरपोलकडून चोरट्यांचा शोध सुरु

SCROLL FOR NEXT