Sudin Dhavalikar Birthday: सुदिन ढवळीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; देवदर्शन आणि साधेपणाने साजरा केला वाढदिवस

Sudin Dhavalikar Birthday Celebration: मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते, मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त चाहते, मित्र, कार्यकर्ते आणि मतदारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
Sudin Dhavalikar Birthday Celebration
Sudin Dhavalikar BirthdayDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

फोंडा: मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते, मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त चाहते, मित्र, कार्यकर्ते आणि मतदारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. शनिवारी त्यांचा वाढदिवस असल्याने सकाळपासूनच अनेकांनी मोबाईल आणि समाजमाध्यमांद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर आपला वाढदिवस कधीही जाहीररीत्या साजरा करीत नाहीत. देवतांचे आशीर्वाद घेण्याबरोबरच कुटुंबीयांसमवेत देवदर्शन करून ते हा दिवस साधेपणाने घालवतात. यंदाही ते एका खासगी कार्यक्रमासाठी बंगळुरू येथे गेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भेट घेणे शक्य नसले, तरी त्यांच्या चाहत्यांनी दूरध्वनी, संदेश आणि समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा देत आपुलकी व्यक्त केली. दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.

Sudin Dhavalikar Birthday Celebration
Bahujan Representation in Goa: लोकसंख्येत 39 टक्के, पण सत्तेतील वाटा 8 टक्क्यांहून कमी; गोव्याच्या मंत्रिमंडळात बहुजनांची पीछेहाट

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही सुदिन ढवळीकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि गोमंतकीय जनतेच्या सेवेसाठी समर्पित दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही ढवळीकरांना शुछेच्छा दिल्या. दरम्यान, सुदिन ढवळीकर यांनीही सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.