Maharashtrian Shepu Bhaji: शेपू आवडतो की नावडतो? या भाजीच्या प्रेमात पडाल, अशी आहे चवीची भन्नाट कहाणी

Dill Leaves Recipes: एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची दुर्गम भागात बदली करणे हीसुद्धा एक प्रकारची शिक्षाच समजली जायची.
Dill Leaves Recipes
Maharashtrian Shepu BhajiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

केदार साखरदांडे

एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची दुर्गम भागात बदली करणे हीसुद्धा एक प्रकारची शिक्षाच समजली जायची. त्याच धर्तीवर, ‘तुला मेल्या, अशीच शिक्षा करते. अहोरात्र फक्त शेपूची भाजी खाऊ घालते!’ असंही गंमतीने म्हटलं जातं. विनोदाचा भाग सोडला तर शेपूचंही असंच आहे. एकतर तुम्हाला ती खूप आवडते वा अजिबात आवडत नाही. एकदम एक्स्ट्रीम! Either you love शेपू or hate शेपू!

तुम्ही म्हणाल, शेपू हा काय लिहायचा विषय आहे का? तुमचीही चूक नाही म्हणा; कारण शेपू कुणा कुणाला आवडतो, असं विचारल्यावर शंभरपैकी नव्वद लोक नाही म्हणूनच सांगतील. मीही त्या नव्वदांतच होतो. अगदी बरीच वर्षे मला शेपू अजिबात आवडत नव्हता. कोथिंबिरीच्या पंक्तीतली ही भाजी दुर्लक्षित राहिलेली आहे. तिची उग्र चव हे त्यामागचं कारण असावं. ‘शेपूची भाजी खाणे’ ही काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखी वाटेल की काय, अशी माझी स्थिती असायची.

Dill Leaves Recipes
Bahujan Representation in Goa: लोकसंख्येत 39 टक्के, पण सत्तेतील वाटा 8 टक्क्यांहून कमी; गोव्याच्या मंत्रिमंडळात बहुजनांची पीछेहाट

काही जण शेपूच्या भाजीची जाम चेष्टा करतात. जुन्या काळात सैबेरियाला पाठवणे ही शिक्षेची अत्युच्च परिसीमा समजली जायची. आपल्या स्थानिक भाषेत सांगायचं तर, एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याची दुर्गम भागात बदली करणे हीसुद्धा एक प्रकारची शिक्षाच समजली जायची. त्याच धर्तीवर, ‘तुला मेल्या, अशीच शिक्षा करते. अहोरात्र फक्त शेपूची भाजी खाऊ घालते!’ असंही गंमतीने म्हटलं जातं. विनोदाचा भाग सोडला तर शेपूचंही असंच आहे. एकतर तुम्हाला ती खूप आवडते किंवा अजिबात आवडत नाही. अधलंमधलं काही नाही. एकदम एक्स्ट्रीम! Either you love शेपू or hate शेपू!

पण माझ्या सासूमाईंना ही भाजी खूप आवडायची. ती भाजी करायची त्यांची वेगळी पद्धत होती. खोबरेल तेलावर त्या राईची जबरदस्त फोडणी द्यायच्या. इतकी जबरदस्त की घरातल्या प्रत्येक माणसाला खोकला आलाच पाहिजे. मग त्या फोडणीत बारीक चिरलेला कांदा आणि लसूण मस्तपैकी परतवून घ्यायच्या. त्या वासाने शेपूची भाजी खाण्याची प्राथमिक तयारी पूर्ण व्हायची. आता लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्यांची त्यात भर पडायची आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेला शेपू, मीठ, मिरची, हळद. बस, इतकेच जिन्नस! मग भांड्यावर झाकण ठेवायचे आणि त्यावर पाणी घालायचे, भाजी व्यवस्थित शिजण्यासाठी.

तिथे भाजी शिजता शिजता इकडे त्या भाकरीचे पीठ गरम पाणी आणि तेल घालून मळायला घ्यायच्या. त्या भाकरीच्या पिठालासुद्धा मगाशी हाताने चिरलेल्या शेपूचा सुंदर अरोमा यायचा. भाजी तयार होईपर्यंत भाकरी भाजायला घ्यायच्या. तोपर्यंत सणसणीत भूक लागलेली असायची आणि शेपूची भाजी व भाकरी हे कॉम्बिनेशन भन्नाट लागायचं.

शेपूची भाजी जर चुकून उरली, तर शक्यता तशी कमीच; पण समजा उरलीच, तर मग त्यात मस्त उकडलेले बटाटे, थोडा गरम मसाला आणि टोस्टचा चुरा गुंतवून अफाट कटलेट करावं. एक अजरामर, स्वर्गीय पदार्थ तयार होतो. छान सोनेरी रंगाचं हे कटलेट दृष्टी आणि जिभेला भुलवून टाकतं. ही माझ्या आईची खासियत! हे लिहितानासुद्धा तपकिरी-सोनेरी रंगाचं ते कटलेट डोळ्यांसमोर उभं राहतंय. साक्षात सुवर्णमृग! ज्याने सीतामाईलाही वनात भुरळ पाडली होती. फरक एवढाच की सुवर्णमृग फसवा, मायावी होता; पण शेपूचं हे कटलेट अस्सल सोनेरी! अगदी २४ कॅरेट!

Dill Leaves Recipes
Goa Crime: 'अयशस्वी प्रेमसंबंध म्हणजे बलात्कार नव्हे'; लग्नाचे आमिष दाखविल्याच्या आरोपातून युवक निर्दोष

कुठलीही भाजी बटाट्याच्या पदरी पडली की तिला पवित्र करून घेण्याचं सामर्थ्य बटाट्यामध्ये आहे. शेपूची भाजी त्याला अपवाद कशी असेल? बरोबर मस्त गरमागरम भात आणि त्यावर घट्ट दही. ऑसम कॉम्बो! बोनस म्हणजे ताकातल्या मिरच्या तळून, मुरडून त्या दहीभातावर घ्यायच्या. बास! आणि जगात काही नको. कधी कधी शेपू न्याहारीलासुद्धा यायचा. तांदळाच्या पिठात शेपू वाटून घालायचा आणि त्याच्या मस्तपैकी सुळसुळीत पोळ्या काढायच्या. बरोबर लाल मिरची, खोबरे घालून केलेली चटणी किंवा नसेल तर मस्त काकवी.

हिरव्या रंगाच्या लुसलुशीत पोळ्यांबरोबर चटणी किंवा काकवी म्हणजे दिवसाची अफलातून सुरुवात! शेपूची भाजी दुसऱ्या दिवशीसुद्धा तितकीच छान लागते. किंबहुना काही पदार्थ दुसऱ्या दिवशी अधिक चविष्ट होतात, त्यात शेपूचा नंबर वरचा लागेल. कधी गरमागरम पोळीबरोबर तर कधी भाकरीच्या तुकड्याबरोबर ती खाण्याची मजाच वेगळी. शेपूची चव सुरुवातीला जरी जरा उग्र वाटली तरी एकदा तिच्याशी मैत्री झाली की तिच्याशिवाय जेवणात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.