Police Raid Dainik Gomantak
गोवा

गुळे येथून अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी 3 लाख 77 हजारांचा दारुसाठा केला जप्त

बुधवारी रात्री उशिरा हा छापा टाकण्यात आला.

दैनिक गोमन्तक

गुळे: अबकारी खात्याच्या काणकोण अधिकाऱ्यानी गुळे येथील एका दुकानावर छापा टाकून 3 लाख 77 हजार रुपये किमतीचा अवैध दारुसाठा जप्त केला. बुधवारी रात्री उशिरा हा छापा टाकण्यात आला. एका किरकोळ दारू विक्री दुकानातून हा अवैध परदेशी बनावटीची दारू जप्त करण्यात आली असे अबकारी खात्याचे अधिकारी शेखर देसाई यांनी सांगितले. हा अवैध साठा अबकारी खात्याने पंचनामा करून ताब्यात घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले. (Police Raid Goa News)

मागील काही दिवसात पोलिसांनी (Police) अनेक ठिकाणाहून बेकायदेशीर मद्य, रोख रक्कम, ड्रग्स अशा अनेक अवैध वस्तू जप्त केल्या आहेत. यातच सोमवारी कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे (Railway) स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन 25,100 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या 139 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस राज्यात 24 तास सतर्क राहून गुन्हे घडू नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत.

21 तारखेला कोलवाळ पोलिसांनी वयलोवाडो-कोलवाळ येथे साठवून ठेवलेली 69 हजारांची दारू जप्त केली. तसेच पेढणे (Pernem) पोलिसांनी देखील 171 लिटर मद्य जप्त केले. हा मद्यसाठा एमएच 07 एजे 1272 या वाहनात लपवण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT