Utpal Parrikar
Utpal ParrikarDainik Gomantak

Goa Election: उत्पल पर्रीकर आज पणजीतून उमेदवारी अर्ज भरणार?

उत्पल यांनी मागील आठवड्यात भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

पणजी: उत्पल पर्रीकर आज (गुरुवारी) पणजी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे . या जागेसाठी ते भाजपकडून उमेदवारी मिळवण्यास आग्रही होते, मात्र भाजपने पणजीतून बाबुश मोन्सेरात यांना उभे केले. पक्षावर नाराज असलेल्या उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकून स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. ते उमेदवारी अर्ज कधी भरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. (Utpal Parrikar Panaji Goa Latest News)

Utpal Parrikar
Goa Election: कुंभारजुवेमधून रोहन हरमलकर अपक्ष लढणार

उत्पल यांनी मागील आठवड्यात भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. "मी पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. मनोहर पर्रीकर यांना एवढी वर्षे पणजी लोकांनी मतदान केले कारण ते काही मूल्यांसाठी उभे होते. माझ्यातही ती मूल्ये आहेत. मी आशा करतो की पणजी मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील," असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

Utpal Parrikar
AAP Amit Palekar: पैसा नाही, ओळख नाही, पण नोकरी हवी? मग AAP ला मत द्या

भाजपने तिकीट नकरल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी उत्पल यांना त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर पणजीतून उमेदवारी देण्याची ऑफर दिली होती. शिवसेनेनेही (Shiv Sena) त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास तृणमूल कॉंग्रेस देखील त्यांचा मागे उभे राहण्यास तयार आहे.

आम्हाला विश्वास आहे की, पणजीमध्ये उत्पल पर्रीकर बाबूश मोन्सेरात यांचा पराभव करतील म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देऊ इच्छितो. याबाबत पुढील 24 ते 48 तासांत निर्णय घेतला जाईल, असे तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) राष्ट्रीय पातळीवरील नेत्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com