Water Dispute
Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Water Dispute: जनतेचे पाणी‘आयुष’ला वळवले; लोकांची मात्र वणवण

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे तालुक्यातील जनतेचे पाणी सरकारने आयुष हॉस्पिटलला देऊन जनतेवर मात्र, पाणी पाणी करण्याची वेळ आणली आहे. 24 तास पाण्याच्या गप्पा होतात,पण गोवा टँकर मुक्त होत नाही. सरकारने पेडणे तालुक्यासाठी चांदेल येथे 15 एमएलडी पाणी प्रकल्प उभारला.

पण वाढत्या लोकसंख्येमुळे जनतेला पुरेसे पाणी मिळत नाही. त्याच 15 एमएलडी मधील दोन एमएलडी पाणी थेट आयुष हॉस्पिटलला दिले आहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघात पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू झाली आहे.

दरम्यान, बाबू आजगावकर पेडणेतून निवडून आले होते, तेव्हा त्यांनी पेडणेत पाणी पुरवठा व्यवस्थित करा, असा इशारा दिल्यानंतर अधिकारीही पेडणेला पुरेसे पाणी पुरवायचे आणि मांद्रेबद्दल दुजाभाव व्हायचा.तीच स्थिती पुन्हा उद्‍भवली आहे. मांद्रेसाठी येणारे पाणी कमी दाबाने सोडले जात असल्यामुळे प्रत्येक घरापर्यंत ते पोहोचत नाही.

मांद्रे मतदारसंघातील प्रत्येक गावात नळाला पाणी आता येईल, मग येईल म्हणून महिलांवर प्रतीक्षाच नव्हे तर जागरण करावे लागत आहे. आमदार जीत आरोलकर पदरमोड करून टँकरने पाणी पुरवत आहेत. परंतु रस्त्यालगतच्या घरांनाच टँकरचे पाणी मिळत असल्याचे दिसते. ज्यांची घरे रस्त्यापासून दूर आहेत,त्यांना पाणी मिळत नाही. परिणामी पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे.

लोकप्रतिनिधींवर वाढता रोष

जनतेच्या तोंडचे पाणी पळवून औद्योगिक वसाहतींना पुरवण्याचे कटकारस्थान सरकारने आखले आहे. पाण्याचे नियोजन न करता उपलब्ध पाणीच उद्योग व्यवसायाला पुरवण्याकडे सरकारचा कल आहे. चांदेल येथून पाणी थेट मांद्रे मतदारसंघासाठी येते.

मांद्रेला 3.5 एमएलडी लिटर दररोज पाण्याची गरज आहे,पण तेवढेही मांद्रेवासीयांना मिळत नाही. परंतु चांदेल पाणी प्रकल्पातील दोन एमएलडी पाणी थेट धारगळ येथील आयुष हॉस्पिटलला सरकारने देऊन लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यामुळे आमदारांना मतदारसंघात फिरताना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

पंप लावणाऱ्यांवर कारवाई होणार का?

आधीच कमी दाबाने पाणी सोडले जाते. आणि जिथे कमी दाबाने पाणी सोडले जाते, त्याच नळाला पंप लावून काहीजण पाणी खेचत असल्याचे दिसते. पंपाद्वारे नळाचे पाणी खेचणाऱ्यांवर कधी कारवाई करणार, अशी विचारणा होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pallavi Dempo: पल्लवी धेंपे म्हणतात... मला गरिबांच्या समस्या कळतात!

Mysterious Artefact Found In Goa: पणजीत आढळलेल्‍या मूर्तीवर करणार कार्बन प्रक्रिया : नीलेश फळदेसाई

High Tide Alert For Panaji: पणजीसाठी 22 दिवस धोक्याचे; पावसाळ्यात उसळणार 4.5 मीटरपेक्षा अधिक उंच लाटा

Vishwajit Rane On Congress: काँग्रेसने काय दिवे लावले? विश्वजीत राणेंचा घणाघात

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

SCROLL FOR NEXT