Goa Tourism: कॅसिनोमुळे पर्यटन उद्योगाला धोका

डॉ. के.गिरेसन ः गोव्याचे विविध क्षेत्रांत मार्गक्रमण,भविष्यातील शक्यतांवर चर्चा
Casino
CasinoDainik Gomantak

गोव्यात कॅसिनो पर्यंटनाला एवढे महत्व का दिले जाते, याचे आश्र्चर्य वाटत असल्याचे सांगून कॅसिनोमुळे पर्यटन उद्योगाला धोका उदभवू शकतो, असे पुणे येथील एमआयटी-एसओजीचे संचालक डॉ. के. गिरेसन यांनी स्पष्ट केले. गोवा सरकारने आरोग्य. पर्यटन, वाहतूक व पार्किंग या क्षेत्रामध्ये साधन सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. गोव्यासारख्या राज्याला ‘होम स्टे’ पर्यटन हा उत्पन्नाचा एक चांगला पर्याय असू शकतो, असेही त्यांनी सुचविले.

व्हीव्हीएम गोविंद रामनाथ कारे कायदा महाविद्यालय व बांदोडा येथील संजीवन युवा विकास सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने मडगावात शनिवारी आयोजित एक दिवसीय चर्चासत्रात तज्ज्ञांनी गोव्याच्या विविध क्षेत्रातील मार्गक्रमण व भविष्यातील संभावनांवर चर्चा केली. उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गिरेसन बोलत होते.

ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई व नागेश सरदेसाई यांनी गोव्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला. ‘मानसोपचार’चे सहा. प्रा. डॉ. सुदेश गावडे यांनी सांगितले,की उपेक्षित समाजातील प्रतिनिधींना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही,ही खेदाची बाब आहे.

Casino
Water Dispute : साळ गावावर तीव्र पाणीटंचाईचे संकट

‘गोव्यातील सार्वजनिक सेवा’ चर्चासत्रात निवृत्त जिल्हाधिकारी एन. डी. अग्रवाल, गोवा राज्य एससी,एसटी आर्थिक व विकास महामंडळाचे एमडी. प्रसाद वळवईकर यांनी भाग घेतला. फा. आग्नेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सावियो फालेरो यांनी नियंत्रकाचे काम पाहिले.

‘गोव्याचा आर्थिक विकास व पर्यावरणीय शाश्‍वती’ वरील चर्चासत्रात श्री मल्लिकार्जुन चेतन मंजू देसाई कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोज कामत. ईपी कामत ग्रुपचे राजकुमार कामत, पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी भाग घेतला. या सत्राचे नियंत्रक म्हणून एमईएसचे सहा. प्रो. दत्तप्रसाद शिरगुरकर यांनी काम पाहिले.

Casino
Sal festival: साळ गडेत्सवसाठी वाहतूक, पार्किंग नियोजन

जमीन रुपांतरणासह विविध मुद्दे चर्चेत

जमिनीच्या बेकायदा रुपांतरणावर तसेच ड्रग्स व्यवहार, विविध क्षेत्रामधील भ्रष्टाचार यावरही चर्चा झाली. गोव्याच्या उज्वल भविष्यासाठी शाश्‍वत पर्यटन, मच्छिमारी व खाण उद्योगाला चालना देणे गरजेचे व महत्वाचे असल्याचेही मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com