Passenger's condition due to closure of fifth ferry on Chodan-Ribandar route Dainik Gomantak
गोवा

चोडण-रायबंदर मार्गावरील पाचवी फेरीबोट बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल

5 मे रोजी लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त पाच फेरीबोटी सुरळीत होत्या

दैनिक गोमन्तक

तिसवाडी: चोडण-रायबंदर जलमार्गावरील पाचवी फेरीबोट कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे काल दिवसभर व आज दुपारपर्यंत बंद ठेवण्याचा प्रकार आठ दिवसाच्या अंतराने घडला असल्याने या मार्गावरील प्रवाशांना व वाहनचालकांचे हाल झाले.

5 मे रोजी लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त पाच फेरीबोटी सुरळीत होत्या; परंतु दुसऱ्या दिवशी 6 व 7 रोजी कर्मचारी नसल्याने या मार्गावरील पाचवी फेरीबोट बंद ठेवण्यात आल्याने जत्रेनिमित्त घरी जाणाऱ्या धोंड व भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या आठवड्यात अशाच प्रकारे फेरीबोट बंद ठेवण्यात आली. शेवटी लोकांचा रोष ओढवल्याने आमदार प्रेमेंद्र शेट व खात्याचे वरिष्ठ अधिकारी विक्रमसिंग भोसले यांनी नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांची सचिवालयात भेट घेतली.

त्यांचे म्हणणे मान्य करत चोडण-रायबंदर जलमार्गावर भविष्यात कर्मचाऱ्यांमुळे फेरीबोट बंद ठेवण्यात येणार नाही, अशी हमी फळदेसाई यांनी दिली. मात्र कालच्या घटनेमुळे या मार्गावरील प्रवासी व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अधिकारी भोसले यांनी या मार्गावर सुरळीत सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली असली तरी खात्याकडे नोकरभरती नसल्याने अडचण होत आहे. आज दुपारी कर्मचारी कामावर आल्याने पाचवी फेरीबोट पूर्ववत सुरू झाल्याने प्रवासी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही: मुख्यमंत्री

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

Mapusa: बार्देश प्रशासकीय संकुलाची दुर्दशा! नाक मुठीत धरून करावी लागते ये-जा; पार्किंगची समस्याही जटील

Weekly Horoscope: आर्थिक बाबतीत सावधगिरी, करिअरमध्ये प्रगती; जाणून घ्या तुमच्या राशीचा आठवडा कसा असेल?

Morjim: वाळूचे तेंब उद्ध्वस्त करून पार्किंग प्रकल्प नकोच! नागरिकांचा इशारा; पंचायत, आमदाराचा प्रकल्पाला पाठिंबा

SCROLL FOR NEXT