Konkan Railway: फुकट्यांचा 'गेम ओव्हर'! कोकण रेल्वेची मोठी कारवाई; विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केला 22 कोटींचा दंड

Konkan Railway Ticketless Travel: विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर विशेष तपासणी मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे.
Konkan Railway Ticketless Travel
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway Ticketless Travel: कोकण रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली असून, जानेवारी 2026 पर्यंत केलेल्या कारवाईतून कोट्यवधींचा दंड वसूल केला. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट आणि अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर विशेष तपासणी मोहिमांचे आयोजन करण्यात येत आहे. केवळ जानेवारी 2026 या एका महिन्यातच रेल्वेने 1,014 विशेष मोहिमा राबवल्या. या मोहिमांमध्ये 44,736 प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. या प्रवाशांकडून रेल्वेने भाडे आणि दंड स्वरुपात तब्बल 2.53 कोटी रुपये वसूल केले.

प्रशासनाने जाहीर केलेल्या एकत्रित आकडेवारीनुसार, एप्रिल 2025 पासून जानेवारी 2026 पर्यंत एकूण 9,495 तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या संपूर्ण कालावधीत आतापर्यंत 4.13 लाखांहून अधिक प्रवासी नियमांचे उल्लंघन करुन प्रवास करताना पकडले गेले. या सर्व कारवायांतून कोकण रेल्वेने (Konkan Railway) आतापर्यंत 22.81 कोटी रुपयांचा महसूल दंडाच्या रुपाने गोळा केला. प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेऊनच सन्मानाने प्रवास करावा आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार रेल्वेकडून केले जाते.

Konkan Railway Ticketless Travel
Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेच्या नावाखाली 'भामट्यांचा' सुळसुळाट; नोकरीच्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नका, रेल्वे प्रशासनाचे आवाहन!

विनातिकीट प्रवासामुळे रेल्वेच्या महसुलावर होणारा परिणाम रोखण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी ही कठोर पावले उचलली जात आहेत. कोकण रेल्वे मार्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या मार्गावरील गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रेल्वेच्या भरारी पथकांनी आणि तिकीट तपासनीसांनी आता प्रत्येक स्थानकावर आणि धावत्या गाड्यांमध्ये तपासणीचा फास अधिक घट्ट केला आहे. आगामी काळातही ही मोहीम अशीच सुरु राहणार असून विनातिकीट प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com