Mobile Hacking Bank Theft
Goa Online FraudDainik Gomantak

Goa Online Fraud: मोबाईलवरची 'ती' एक चूक अन् 74 लाख गायब! सायबर भामट्यांनी गोव्यात दोघांना घातला गंडा; फोनने केला गेम

Mobile Hacking Bank Theft: वास्को आणि दाबोळीतील दोन रहिवाशांना ऑनलाइन फसवणुकीचा मोठा फटका बसला.
Published on

पणजी: वास्को आणि दाबोळीतील दोन रहिवाशांना ऑनलाइन फसवणुकीचा मोठा फटका बसला. चोरट्यांनी 'APK' फाईलच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून तब्बल 74.1 लाख रुपये लंपास केले. सायबर गुन्हेगारांनी वापरलेली ही नवी पद्धत सध्या चिंतेचा विषय ठरत असून, केवळ एका चुकीच्या डाऊनलोडमुळे या व्यक्तींची आयुष्यभराची कमाई धोक्यात आली.

पहिल्या घटनेत, वास्को येथील एका व्यक्तीची 72.3 लाख रुपयांची फसवणूक झाली. या पीडित व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, ज्याने स्वतःची ओळख बँकेचा अधिकारी म्हणून करुन दिली. बँकेचे काही व्यवहार सोपे करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी एक विशिष्ट 'अ‍ॅप्लिकेशन' डाऊनलोड करणे गरजेचे असल्याचे या भामट्याने भासवले. त्यासाठी त्याने पीडित व्यक्तीला एक 'APK' फाईल पाठवली. समोरची व्यक्ती बँकेतूनच बोलत आहे, अशा विश्वासाने त्या व्यक्तीने ती फाईल आपल्या मोबाईलमध्ये (Mobile) डाऊनलोड केली. मात्र, फाईल इन्स्टॉल होताच त्या व्यक्तीच्या मोबाईलचा ताबा जणू हॅकर्सकडे गेला आणि त्यांच्या संमतीशिवाय खात्यातून टप्प्याटप्प्याने 72.3 लाख रुपये डेबिट झाले.

Mobile Hacking Bank Theft
Goa Online Fraud: राज्यात भामट्यांचा उच्छाद! पोलिस अधिकारी असल्याचे भासवून महिलेला लाखोंचा गंडा?

दुसरी घटना दाबोळी परिसरात घडली, जिथे एका रहिवाशाला 1.8 लाखांचा चुना लावण्यात आला. या प्रकरणात सायबर चोरांनी 'आरडीओ ई-चलन'चे (RTO e-challan) निमित्त साधले. तुमच्या वाहनाचे चलन प्रलंबित असून ते पाहण्यासाठी खालील फाईल ओपन करा, असा संदेश पीडित व्यक्तीला पाठवण्यात आला होता. आरटीओच्या नावाने आलेली ही फाईल देखील एक 'APK' फॉरमॅटमधील व्हायरस होती. पीडित व्यक्तीने चलन भरण्याच्या घाईत ती फाईल ओपन केली आणि काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे मेसेज येऊ लागले.

Mobile Hacking Bank Theft
Online Fraud: सायबर ठगांचा माजी IPS अधिकाऱ्याला विळखा! ऑनलाइन फ्रॉडमुळे स्वत:वर झाडली गोळी; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

या दोन्ही घटनांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे 'APK' फाईल. या फाईल्स गुगल प्ले स्टोअरसारख्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर नसून थेट पाठवल्या जातात. एकदा का या फाईल्स मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्या की, त्याद्वारे हॅकर्स तुमच्या मोबाईलमधील मेसेज, ओटीपी आणि बँक डिटेल्स चोरु शकतात. वास्को (Vasco) पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. मात्र, या घटनांमुळे डिजिटल व्यवहार करताना नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही लिंक किंवा फाईल्सवर क्लिक करु नये, असे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com