Goa Carnival
Goa CarnivalDainik Gomantak

Goa Carnival: मडगावात रविवारी कार्निव्हल शोभायात्रा; सर्व तयारी पूर्ण, चोख सुरक्षा व्यवस्था; 200 पोलिस तैनात असणार

Goa Carnival 2026: मडगावात रविवारी १५ फेब्रुवारी रोजी कार्निव्हल शोभायात्रा हॉली स्पिरिटचर्च ते पालिका चौक दरम्यान निघणार.
Published on

मडगाव: मडगावात रविवारी १५ फेब्रुवारी रोजी कार्निव्हल शोभायात्रा हॉली स्पिरिटचर्च ते पालिका चौक दरम्यान निघणार असून, सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषेदेत दिली. 

दुपारी ४ वाजता शोभायात्रा निघून रात्री दहाच्या आतापर्यंत ती संपेल याची आम्ही सर्व खबरदारी घेतली आहे. शोभायात्रेत सहभागी पथकांना याबाबत कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष बबिता नाईक, मडगाव कार्निव्हल समितीच्या प्रभारी अध्यक्ष मिलाग्रीन गोम्स, मुख्याधिकारी मधू नार्वेकर व अन्य नगरसेवक उपस्थित होते.

Goa Carnival
Goa Online Fraud: मोबाईलवरची 'ती' एक चूक अन् 74 लाख गायब! सायबर भामट्यांनी गोव्यात दोघांना घातला गंडा; फोनने केला गेम

शिरोडकर यांनी सांगितले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खवटे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, आमदार विजय सरदेसाई, उल्हास तुयेकर व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे उपस्थित राहणार आहेत. शोभायात्रेच्या ठिकाणी अम्बुलन्स, अग्निशामक दल तैनात केले जाणार असून नजर ठेवण्यासाठी टॉवरही उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Goa Carnival
Goa Tour Package: गोवा वाले बीच पे...! 'IRCTC' घेऊन आलीय स्वस्त आणि मस्त टूर पॅकेज, कसं करायचं बुकिंग? जाणून घ्या सर्व माहिती

२०० पोलिस तैनात

दरम्यान, या शोभायात्रेवेळी एकूण २०० पोलिस तैनात केले जाणार असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली. दुपारनंतर शोभायात्रेचा मार्ग अन्य वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे. कार्निव्हलनिमित्त ठिकठकाणी खेळ तियात्रही आयोजित केले आहेत, त्याठिकाणीही पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com