गोवा पोलिसांची मोठी कारवाई! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा बनावट अधिकारी जेरबंद; वागातोर येथील क्लब मालकाची 14 लाखांची फसवणूक

Fake GSPCB Official Arrested: सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई केली.
Fake GSPCB Official Arrested
Fake GSPCB Official ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी अधिकारी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी मोठी कारवाई केली. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी असल्याचे सांगून वागातोर येथील 'क्लब गोया'च्या मालकाला तब्बल 14.23 लाखांचा गंडा घालणाऱ्या सूरज पेंडसे याला पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सरकारी कामाच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीचे मोठे रॅकेट समोर आले.

अशी केली फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सूरज पेंडसे याने आपली ओळख गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकृत अधिकारी म्हणून करुन दिली होती. वागातोर (Vagator) येथील प्रसिद्ध 'क्लब गोया'च्या मालकाशी संपर्क साधून क्लबचा प्रदूषण परवाना नूतनीकरण करणे आणि तो अपग्रेड करुन देण्याचे आमिष त्याने दाखवले. या प्रक्रियेसाठी लागणारे शुल्क आणि इतर कामांच्या बहाण्याने त्याने वेळोवेळी एकूण 14.23 लाख रुपये उकळले.

Fake GSPCB Official Arrested
Goa Police Salary: '..त्यांच्यापेक्षा आम्हाला कमी पगार मिळतो'! गोव्यातील हेड कॉन्स्टेबल्सनी दाखल केली याचिका; खंडपीठाकडून नोटीस

परवान्याच्या नावाखाली लुबाडणूक

बऱ्याच काळानंतरही परवाना न मिळाल्याने आणि सूरजच्या वागणुकीबद्दल शंका आल्याने क्लब मालकाने चौकशी केली. तेव्हा सूरज पेंडसे हा कोणताही सरकारी अधिकारी नसून त्याने फसवणूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी हणजूण (Anjuna) पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संशयित सूरजला बेड्या ठोकल्या.

पोलिसांचे आवाहन

सरकारी परवाने किंवा नूतनीकरणासाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सूरज पेंडसे याने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे बनावट अधिकारी बनून फिरणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com