Goa Paragliding Suspension Dainik Gomantak
गोवा

Paragliding in Goa: "मायकलक भिवपाची गरज ना"!! पॅराग्लायडिंगवर बंदी नाही स्थगिती आहे; पर्यटनमंत्र्यांनी सोडवला गुंता

Goa Tourism News: पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी गोव्यात पॅराग्लायडिंगच्या व्यवसायावर बंदी नसून काई दिवसांसाठी हा व्यवसाय स्थगित केला असल्याची माहिती दिली

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात काही दिवसांपूर्वी पॅराग्लायडिंग करतानाच पुण्यातील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला, यावेळी दोरी तुटल्याने तिच्या सोबत असलेल्या वैमानिकाला देखील प्राण गमवावे लागले होते. या घटनेनंतर विभागाकडून गोव्यात होणाऱ्या पॅराग्लायडिंगच्या व्यवसायावर बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली होती, ज्यावर कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी देखील प्रश्नचिह्न उभं केलं.

रविवारी (२६ जानेवारी) रोजी पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी गोव्यात पॅराग्लायडिंगच्या व्यवसायावर बंदी नसून काई दिवसांसाठी हा व्यवसाय स्थगित केला असल्याची माहिती दिली.

पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यासाठी इथे येणारी पर्यटकांची सुरक्षा फार महत्वाची आहे, आणि अशा बेकायदशीर घटनांवर कायमचा आळा बसावा म्हणून पर्यटनखात्याला किंवा सरकारला काही नियम कडक करावेच लागतात, मात्र याचा अर्थ गोव्यातल्या पॅराग्लायडिंगच्या व्यवसायावर कायमची बंदी आहे असा होत नाही. ते पुढे म्हणाले की आमदार मायकल लोबो यांना कदाचीत चुकीची माहिती मिळाली असण्याची शक्यता आहे, मात्र त्यांनी घाबरण्याची काहीही गरज नाही.

पॅराग्लायडिंग सारख्या ऍडव्हेंचर स्पोर्स्टमध्ये कितीही कायदा भक्कम केला तरीही अशा घटना घडण्याची शक्यता असते. गोव्यात पॅराग्लायडिंगवर बंदी नाही, मात्र हा व्यवसाय चालवणाऱ्या प्रत्येकाला त्यांची वैध कागदपत्रे तपासणीसाठी पर्यटन खात्याला दाखवावी लागणार आहेत.

गोवा पर्यटन खात्याला पर्यटकांच्या आयुष्याची चिंता आहे, कारण एकदा गमावलेला जीव परत मिळवता येत नाही असे पर्यटनमंत्री रोहन खवंटे म्हणालेत.

काय म्हणाले लोबो?

राज्यातील पॅराग्लायडिंग व्यवसायावर बंदी आणण्याचा सरकारचा विचार योग्य नसून त्या व्यवसायाशी संबंधित कायदे तसेच नियम लागू करून त्याला कायदेशीर पर्यटन व्यवसाय करण्यावर सरकारने भर द्यावा, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली. राज्यात नुकत्याच झालेल्या पॅराग्लायडिंग व्यवसायाशी संबंधित अपघात व मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने या व्यवसायावर कायमची बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता.

त्या अनुषंगाने किनारी भागाशी संबंधित आमदार या नात्याने त्यांच्याशी विचारणा केली असता ते बोलत होते. दरम्यान, पॅराग्लायडिंग हा पर्यटकांचा आवडता खेळ असून या व्यवसायाशी संबंधित नवीन कायदे कानून अंमलात आणल्यास राज्यातील पर्यटनाशी संबंधित पॅराग्लायडिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार असल्याचा विश्वास आमदार लोबो यांनी यावेळी बोलून दाखविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Israel Syria Attack: इस्त्रायलचा सीरियावर भीषण हल्ला, दमास्कसमधील संरक्षण मंत्रालय-सैन्य मुख्यालय उडवले; युद्धाची शक्यता वाढली!

Viral Video:...म्हणून शेन वॉर्न ग्रेट आहे... चार चेंडू आणि चार वेरिएशन्स; पाहा फिरकीच्या जादुगाराचा खास व्हिडिओ

Cable Theft Shigao: शिगावमध्ये वीज खात्याच्या केबल चोरीचा प्रयत्न; तिघांना अटक

Ro-Ro Service: मुंबईहून 4 तासांत मालवण, तर 3 तासांत रत्नागिरी! लवकरच सुरु रो-रो सेवा, चाकरमान्यांचा प्रवास होणार सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT