Paragliding Goa: कालबाह्य पॅराग्लायडर, दर्जाबाबत तडजोड; तपासणी पथक आहे कुठे?

Paragliding safety concerns in Goa: केरी पठारावरून उड्डाण घेऊन किनाऱ्याच्या बाजूच्या खडकांवर आदळून युवती आणि पायलटचा जीव जाण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे.
Paragliding safety concerns in Goa
Paragliding safety concerns in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Paragliding safety issues

पणजी: पॅराग्लायडिंग या साहसी खेळासाठी वापरण्यात येणारा पॅराग्लायडर हा अति उच्च दर्जाचा अजिबात वापरला जात नाही. गोव्यात सर्रासपणे नेपाळहून आयात झालेले पॅराग्लायडर हे कालबाह्य असतात.

५० हजारांहूनही कमी किंमतीत तेथे ते उपलब्ध होत असल्याने तेथून ते आयात केले जातात. या पॅराग्लायडरची कालमर्यादा ओलांडून गेलेली कोणाकडूनही तपासली जात नाही. संबंधित यंत्रणेने जर या पॅराग्लायडरची तपासणी केली असती तर दोन जीव गेले नसते, असे पॅराग्लायडिंग व्यवसायिकाने ‘गोमन्तक''ला सांगितले.

केरी पठारावरून उड्डाण घेऊन किनाऱ्याच्या बाजूच्या खडकांवर आदळून युवती आणि पायलटचा जीव जाण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेनंतर जलक्रीडेशी संबंधित व्यवसायिकांचे परवाने तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या कंपनीकडून अनधिकृतपणे पॅराग्लायडर ठेवतात, हे या घटनेवरून दिसून आले आहे. व्यावसायिकाच्या परवान्यावर पॅराग्लायडर किती आहेत ते नमूद केले जाते. परंतु पॅराग्लायडिंग व्यवसाय करणाऱ्याचे परवाने काही पर्यटक पाहत नाहीत, पण हे व्वावसायिक पर्यटकांच्या जीवाशी खेळ खेळतात, असेही यातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पॅराग्लायडिंग करणाऱ्या पायलट किंवा पर्यटकाला कोणतेही राखीव पॅराशूट दिले जात नाही. राखीव पॅराशूट हे उंचीवर काही धोका निर्माण झाल्यास पर्यटक व पायलट सहजपणे खाली येऊ शकतात, यासाठी गरजेचे असतात. परंतु गोव्यातील किनाऱ्यावरील टेकड्यांची उंची फार नाही, त्यामुळे अशा उंचीवरून उड्डाण घेतल्यानंतर हवेत कोणतीही कसरत करता येत नाही.

Paragliding safety concerns in Goa
Goa Paragliding: पायलट हवेत कसरती करतात, त्याच अंगलट येतात; केरीतील दुर्घटनेनंतर व्यावसायिकाचा दावा

पंचायतीचा परवाना नसताना कोलव्‍यात पॅराग्‍लायडिंग कसे?

केरी-पेडणे येथे बेकायदेशीर पॅराग्‍लायडिंग चालू असताना झालेल्‍या दुर्घटनेत दोघांना मृत्‍यू आल्‍यानंतर कोलवा येथे चालू असलेले बेकायदेशीर पॅराग्‍लायडिंग बंद करावे, यासाठी कोलवा सिव्‍हीक फोरमच्‍या ज्‍युडिद आल्‍मेदा यांनी दक्षिण गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांकडे ही तक्रार दाखल केली होती.

ती तक्रार काल जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे दक्षिण गोव्‍याच्‍या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांच्‍याकडे पाठविली. मात्र याबाबतीत पोलिसांनी चौकशी केली असता, त्‍या पॅराग्‍लायडिंग ऑपरेटरकडे सर्व परवाने आहेत, असे आमच्‍या निदर्शनास आले आहे अशी माहिती अधीक्षक सावंत यांनी ‘गोमन्‍तक’ला दिली. असे जरी असले तरी या

Paragliding safety concerns in Goa
Goa Paragliding Accident: गोवा पॅराग्लायडिंग अपघाताचा व्हिडिओ आला समोर; पाहा काळजाचा ठोका चुकवणारी दृष्ये Viral Video

ऑपरेटरला पंचायतीने अजून परवाना दिलेला नाही त्‍यामुळे हा व्‍यवसाय कायदेशीर कसा हा प्रश्र्‍न निर्माण झाला आहे.

बेलॉय-नुवे येथील रायन पिंटो यांच्‍याकडून हा पॅराग्‍लायडिंग व्‍यवसाय चालविला जातो. ०२४ एप्रिल २०२४ रोजी पंचायतीने सुरक्षेच्‍या कारणास्‍तव त्‍यांना हा परवाना नाकारताना त्‍यांनी आपला हा व्‍यवसाय बंद करावा असा आदेश जारी केला होता. मात्र तरीही तो अजून चालूच असल्‍याने सिमांव रॉड्रिग्स यांनी पुन्‍हा एकदा तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com