
पणजी: केरी (पेडणे) येथील डोंगरावर पॅराग्लायडर कोसळून पर्यटक युवती आणि मार्गदर्शकाचा मृत्यू झाल्यानंतर पर्यटन खात्याने राज्यभरात पॅराग्लायडिंगवर बंदी घातली आहे. या घटनेतून पॅराग्लायडिंग व्यवसायातील बेकायदेशीरपणा उघड झाला होता. पॅराग्लायडिंगसाठीची कार्ये पुढील आदेशापर्यंत थांबविली आहेत.
पर्यटन खात्याच्या वतीने पर्यटन संचालक केदार नाईक यांनी हा निर्णय जाहीर केला. पर्यटन खात्याने दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय येईपर्यंत राज्यातील पॅराग्लायडिंग ऑपरेशन तात्काळ थांबवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून गोवा पर्यटन विभागाकडून आता पॅराग्लायडिंगशी संबंधित गोवा पर्यटन नोंदणी व्यापार कायदा १९८२च्या अंतर्गत यापूर्वी केलेल्या सर्व नोंदण्याचें पुनरावलोकन केले जाणार आहे. राज्यातील सर्व पॅराग्लायडिंग ऑपरेटरना आवश्यक कागदपत्रे तपासणीसाठी विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
केरी पठारावर झालेल्या भीषण अपघातानंतर गोवा पर्यटन विभागाने नियम कडक केले आहेत. या दुर्दैवी घटनेत पुण्यातील एका तरुणीने आणि आणि नेपाळी मार्गदर्शकाने प्राण गमावले होते आणि त्या घटनेनंतर गोवा पोलिसांनी हाईक एन फ्लाय अपघातात सहभागी असलेल्या कंपनीचे मालक शेखर रायजादा याला अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात शेखर रायजादा याने आवश्यक परवानग्या न घेता पॅराग्लायडिंग उपक्रम सुरू ठेवल्याचे उघड झाले होते. या भीषण अपघातानंतर केरी पठारावर पॅराग्लायडिंग ऑपरेशनसाठी कोणतीही "परवानगी किंवा मान्यता" दिलेली नाही, असे पर्यटन विभागाने स्पष्ट केले होते.
काही दिवसांपूर्वी केरी (पेडणे) येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर पॅराग्लायडिंग व्यवसायाची पोलखोल झाली होती. केरी समुद्रकिनारी डोंगर भागातून पॅराग्लायडिंग करताना अचानक दोरी तुटल्यामुळे पुणे येथील पर्यटक युवती शिवानी दाभळे (वय २६ वर्षे) आणि त्याच पॅराग्लायडरचा पायलट सुमन नेपाळी (वय २५ वर्षे) हे दोघे ठार झाले.
पुणे येथील काही पर्यटक पॅराग्लायडिंग करण्यासाठी केरी डोंगरावरील व्यावसायिकांकडे गेले होते. त्यावेळी पायलट सुमन नेपाळी आणि पुणे येथील पर्यटक शिवानी दाभळे हे दोघे पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडरची एक दोरी तुटल्यामुळे थेट डोंगरावर पडून दोघेही ठार झाले, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.