Goa Paragliding Ban: गोव्यात पॅराग्लायडिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार, 'बंदी'ऐवजी आमदार लोबोंनी सांगितला पर्याय..

Michael Lobo: राज्यातील पर्यटनाशी संबंधित पॅराग्लायडिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार असल्याचा विश्वास आमदार लोबो यांनी यावेळी बोलून दाखविला.

कळंगुट: राज्यातील पॅराग्लायडिंग व्यवसायावर बंदी आणण्याचा सरकारचा विचार योग्य नसून त्या व्यवसायाशी संबंधित कायदे तसेच नियम लागू करून त्याला कायदेशीर पर्यटन व्यवसाय करण्यावर सरकारने भर द्यावा, अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली.

राज्यात नुकत्याच झालेल्या पॅराग्लायडिंग व्यवसायाशी संबंधित अपघात व मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने या व्यवसायावर कायमची बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने किनारी भागाशी संबंधित आमदार या नात्याने त्यांच्याशी विचारणा केली असता ते बोलत होते. दरम्यान, पॅराग्लायडिंग हा पर्यटकांचा आवडता खेळ असून या व्यवसायाशी संबंधित नवीन कायदे कानून अंमलात आणल्यास राज्यातील पर्यटनाशी संबंधित पॅराग्लायडिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार असल्याचा विश्वास आमदार लोबो यांनी यावेळी बोलून दाखविला.

देशातील पर्यटन केंद्र असलेल्या हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून यासंबंधी बोलणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेत राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिलेले आहेत, त्यावर आमदार मायकल लोबो यांचे मत विचारले असता, तो विषय आपला नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com