Miramar Residency Goa Dainik Gomantak
गोवा

Miramar Residency: 587 खोल्या, स्पा आणि स्विमिंग पूल!! बंद पडलेली मिरमार रेसिडेन्सी आता बनणार 'फाईव्ह स्टार हॉटेल'

five-star hotel in Goa: गोव्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या एका प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या एका प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पणजी येथील बंद पडलेल्या मिरमार रेसिडेन्सीचे रूपांतर आता पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने ७४,०८७.७२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी दिली आहे.

मागील महिन्यात शिफारस

गेल्या महिन्यातच गोवा राज्य तज्ञ मूल्यांकन समितीने या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी SEIAA कडे शिफारस केली होती. मिरमार रेसिडेन्सी काही वर्षांपासून बंद असून २०,००० चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली आहे आणि सध्या त्यात सुमारे ६० खोल्या, भोजनगृह आणि इतर सुविधा आहेत.

प्रस्तावानुसार, जीटीडीसीने रेसिडेन्सीचे रूपांतर ५८७ गेस्ट रूम्स असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यात रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स आणि मीटिंग रूम्स, फिटनेस सेंटर, स्पा आणि स्विमिंग पूल यांसारख्या सुविधांचा समावेश असेल.

SEIAAने जीटीडीसीला या प्रकल्पाचे बांधकाम स्थानिक स्वराज्य संस्था आणि नियोजन प्राधिकरणाच्या सध्याच्या फ्लोअर एरिया रिसर्चच्या नियमांनुसार, ७४,०८७.७२ चौरस मीटर क्षेत्रातच असल्याची खात्री करण्यास सांगितले आहे.

परवानग्या आवश्यक

SEIAA ने जीटीडीसीला कामाला सुरुवात करण्यापूर्वी टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी, वन विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसारख्या संबंधित प्राधिकरणांकडून सर्व वैधानिक परवानग्या घेण्याचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यकता असल्याशिवाय कोणतीही झाडे तोडू नयेत, असेही प्राधिकरणाने निर्देश दिले आहेत.

जीटीडीसीला साइटवर कचरा प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सीवेज ट्रीटमेंट प्लांट स्थापित करण्याचे निर्देश दिले आहेत. मॉनिटरिंग ऑटोमेशन आणि व्यवस्थापन प्रणाली स्थापित करावी लागेल. प्रक्रिया केलेले सांडपाणी साइटवर लँडस्केपिंग, फ्लशिंग, कूलिंग टॉवर आणि इतर वापरासाठी पुन्हा वापरले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT