Dudhsagar Tourism: GTDC काऊंटर सुरुच रहाणार; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर दूधसागर जीप ऑपरेटर्सचे आंदोलन मागे

Dudhsagar Tourism: भविष्यात जीटीडीसीसोबत टूर ओपरेटर्सचा होणार ट्रायपार्टी करार होणार असल्याचा ठराव बैठकीत झाला.
Dudhsagar Tourism: GTDC काऊंटर सुरुच रहाणार; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर दूधसागर जीप ऑपरेटर्सचे आंदोलन मागे
CM Dr. Pramod Sawant Meeting With Jeep OperatorsDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले दूधसागर टूर ऑपरेटर्सचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (GTDC) काऊंटर सुरुच राहणार आहे. साखळी येथील रवींद्र भवनात मुख्यमंत्री आणि टूर ऑपरेटर्स यांच्यात पार पडलेल्या पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.

गोवा पर्यटन विकास महामंडळाचे ऑनलाईन काऊंटर बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून दूधसागर टूर ऑपरेटर्स आंदोलन करत आहेत. मागणी अधिक तीव्र झाल्याने संतप्त ऑपरेटर्सनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. माजी खासदार विनय तेंडुलकरांनी शिष्टाई करत दूधसागरच्या ऑफलाईन पर्यटनला सुरुवात झाली. पण, ऑपरेटर्स मागणीवर ठाम राहिले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलनकर्त्या ऑपरेटर्ससोबत तोडगा काढण्यासाठी साखळी येथील रवींद्र भवनात आज (०२ नोव्हेंबर) उशीरा रात्री बैठक घेतली. बैठकीत टूर ऑपरेटर्सनी आंदोलन मागे घेण्याचे मान्य केले. दरम्यान, GTDC चा काऊंटर सुरुच राहणार आहे.

जीटीडीसीच्या काउंटरवर ऑनलाईन बुकींग सुरुच राहणार असून, वाढवलेला दर २०० रुपयांनी कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात जीटीडीसीसोबत टूर ओपरेटर्सचा होणार ट्रायपार्टी करार होणार असल्याचा ठराव बैठकीत झाला.

Dudhsagar Tourism: GTDC काऊंटर सुरुच रहाणार; मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर दूधसागर जीप ऑपरेटर्सचे आंदोलन मागे
Dudhsagar Tourism: अखेर दूधसागर पर्यटन ‘ऑफलाईन’, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; लवकरच निघणार तोडगा

दूधसागर जीप ऑपरेटर्सनी गोवा वनविकास महामंडळाद्वारे ऑनलाईन बुकिंग थांबविण्यासाठी आणि त्यांची बुकिंग वेबसाईट सरकारकडे परत देण्याची मागणी केल्याने गेल्या आठवड्यापासून ऑपरेटर्स आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

टूर ऑपरेटर्सच्या मागण्यावरुन माजी मंत्री दीपक पाऊस्कर, माजी खासदार विनय तेंडुलकरांनी मध्यस्थी केली. तेंडुलकरांच्या शिष्टाईने ऑफलाईन पर्यटन सुरु झाले खरे पण, ऑपरेटर्स त्यांच्या मागणीवर ठाम राहिले. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ऑपरेटर्सनी तूर्त आंदोलन मागे घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com