Dudhsagar Tourism: दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादावरुन वातावरण तापलं, GTDC वर 8 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; संध्याकाळी होणार फैसला!

Jeep Association: दूधसागर पर्यटनासाठी जीटीडीसीकडून सुरु करण्यात आलेल्या वेबसाईट हा 8 कोटींचा घोटाळा असल्याचा घणाघात जीप असोसीएशनकडून करण्यात आला.
Dudhsagar Tourism: दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादावरुन वातावरण तापलं, GTDC वर 8 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; संध्याकाळी होणार फैसला!
Jeep AssociationDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Dudhsagar Tourism Jeep Association Alleges 8 Crore Rupee Scam in GTDC Website

राज्यात सध्या दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन दिवसांपूर्वी, सावर्डे मतदारसंघातील भाजपमधील दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दूधसागर असोसिएशनचा वाद मिटवण्यात स्थानिक आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर अपयशी ठरल्याचा घणाघात सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांनी केला होता.

8 कोटींचा घोटाळा

दरम्यान आज (2 नोव्हेंबर) दूधसागर पर्यटन हंमागाच्या वादावरुन कुळेत वातावरण तंग झालेले पाहायला मिळाले. दूधसागर पर्यटनासाठी जीटीडीसीकडून सुरु करण्यात आलेली वेबसाईट हा 8 कोटींचा घोटाळा असल्याचा घणाघात जीप असोसीएशनकडून करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाची तंबीही असोसीएशनकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या वादावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र खुद्द मुख्यमंत्री आणि स्थानिक आमदारांच्या शिष्टाईनेही देखील यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.

Dudhsagar Tourism: दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादावरुन वातावरण तापलं, GTDC वर 8 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; संध्याकाळी होणार फैसला!
Dudhsagar Tourism: ..आणि 'दूधसागर' हंगाम लवकर सुरु होणार! मुख्‍यमंत्र्यांची जीप ऑपरेटर्ससोबत चर्चा

घटनास्थळी वातावरण तंग

दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) पर्यटन व्यवसायाची वेबसाईट आहे, ती आमची वेबसाईट आम्हाला परत द्यावी. या ठिकाणी जीटीडीसीचा हस्तक्षेप नको. सरकारला जो काही कर आहे, तो आम्ही भरण्यास तयार आहे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कुळेत जीप असोसीएशनकडून साखळी उपोषण सुरु आहे. मात्र आज (2 नोव्हेंबर) उपोषणस्थळी तणावपूर्ण वातावरण बनले. उपोषणकर्ते आणि समर्थकांनी गावाच्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधिक्षक मोठ्या पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.

महिला अंदोलकर्त्या आक्रमक

दुसरीकडे, उपोषण स्थळी स्थानिक महिला आंदोलनकर्त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या. त्यांनी थेट दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी जाणारी पर्यटकांची जीप अडवली. मात्र पोलिसांनी पोलीस बंदोबस्तात पर्यटकांना घेऊन काही जीप मालक दूधसागरकडे रवाना केली. दुसरीकडे मात्र, परिसरात काही अनर्थ घडल्यास त्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असेल असे जीप असोसीएशनचे अध्यक्ष निलेश वेळीप यांच्याकडून सांगण्यात आले.

Dudhsagar Tourism: दूधसागर पर्यटन हंगामाच्या वादावरुन वातावरण तापलं, GTDC वर 8 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; संध्याकाळी होणार फैसला!
Dudhsagar Waterfall: मुख्यमंत्री साहेब ‘दूधसागर’पर्यटन वादावर तोडगा काढा; स्थानिकांच्या मागणीने धरला जोर!

तेंडुलकरांची शिष्टाई

दरम्यान, पर्यटन खात्याच्या काऊंटरच्या मुद्द्यावरुन संघर्षाचा भडका उडणार अशी चिन्हे दिसत असतानाच येथे दाखल झालेल्या माजी खासदार विनय तेंडुलकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना कुळेतील एकंदरीत परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या जीप गाड्या आज दिवसभर ऑनलाईन नोंदणीशिवाय सोडण्यात याव्यात असे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com