Panaji Route Change Dainik Gomantak
गोवा

Panaji: पणजीतील 'हा' मार्ग अचानक बंद! वाहतूक वळवली; काय आहे कारण? पहा..

Panaji Route Change: उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार नव्या पाटो पुलावरून पणजीत येणाऱ्या वाहनांसाठी आजपासून तीन दिवस हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार नव्या पाटो पुलावरून पणजीत येणाऱ्या वाहनांसाठी तीन दिवस हा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना जुन्या पाटो पुलावरून शहरात प्रवेश करावा लागत आहे. साहजिकच मळा आणि शहरातील अन्य रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढला असून, वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहेत.

सकाळी ऐनवेळीच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने पणजीत येणाऱ्या वाहनांना माघारी फिरावे लागले. पणजी शहरात जाणाऱ्या पाटो पुलाचा मार्ग २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. सलग तीन दिवसांच्या कामानिमित्त या मार्गावरील वाहतूक वळविली आहे. सकाळच्या वेळी नवीन पाटो पुलावर दुतर्फा वाहतूक करण्यास परवानगी असेल.

विद्यार्थी, नोकरदारांना फटका

शुक्रवारी वाहतुकीवरही या बंदीचा परिणाम झाला. शाळा सुटण्याच्या वेळी आणि सायंकाळी शहरातून बाहेर पडणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडीचा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून आला. वाहतूक कोंडीचा फटका बसल्यामुळे पणजीतील उद्योजक दत्तप्रसाद नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वारंवार निखळते लोखंडी प्लेट

या मार्गावर काही आठवड्यांपूर्वीच केलेल्या दुरुस्तीनंतर पुन्हा त्याच कामाची दुरुस्ती करण्यात येत आहे. येथील लोखंडी प्लेट पुन्हा निखळली असल्याने तिची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील बाजूने जोडकाम करणे महत्त्वाचे आहे. या कामासाठी तीन दिवसांचा अवधी लागणार असून, तो रस्ता आजपासून बंद राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT