Panaji Municipal Election: भाजप पॅनलचे 50% नवे चेहरे! दामू नाईकांचे स्पष्टीकरण; यादी निश्चितीची प्रक्रिया अजूनही सुरू

Panaji Municipal Election 2026: ५० टक्के नवे चेहरे दिले जातील, असे उत्तर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.
Panaji Municipal Election 2026
Panaji Municipal Election 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपपुरस्कृत ‘टुगेदर फॉर ए प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनलचे उमेदवार यादी निश्चित झाली नाही, येत्या तीन-चार दिवसांत नावे निश्चित होतील. ५० टक्के नवे चेहरे दिले जातील, असे उत्तर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली. त्यामुळे उमेदवारांमध्ये १५ नवे चेहरे दिसणार, हे स्पष्ट झाले आहे.

भाजप पुरस्कृत महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील ‘प्रोग्रेसिव्ह पणजी’ पॅनलच्या संभाव्य तथा इच्छुक ३० उमेदवारांबरोबर सोमवारी सायंकाळी भाजप मुख्य कार्यालयात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष नाईक यांची चर्चा झाली. या बैठकीस मंत्री मोन्सेरातही उपस्थित होते.

बैठकीनंतर नाईक यांनी नाईक यांनी सांगितले की, पक्षाची जी उमेदवार निवड प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेतून ही निवड होणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांबरोबर चर्चा व बैठका झाल्या आहेत, त्यांची ओळख होणे आवश्यक असते. गेली काही दिवसांपासून उमेदवार निवडीसाठी बैठका सुरू आहेत.

Panaji Municipal Election 2026
Panaji Election: पणजी महापालिकेचा बिगूल! 11 मार्चला मतदान, 13 रोजी मतमोजणी; कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा..

काही नावे निश्चित झाली आहेत आणि परंतु ५० टक्के नवे चेहरे देणार असे सांगितले असल्याने ते दिले जातील, असेही त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या उत्तरावर सांगितले. मंत्री मोन्सेरात यांनी सांगितले की, उमेदवार अर्ज मागे घेतल्यानंतर रिंगणार राहणारे उमेदवार असतील ती अंतिम यादी असेल. परंतु उमेदवारांची यादी निश्चितीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

Panaji Municipal Election 2026
Panaji Municipal Election: पणजी महापालिकेसाठी विरोधक येणार एकत्र? पर्रीकर, नाईकांची तयारी; एकास एक उमेदवार देण्याची व्यूहरचना

शुक्रवारी अर्ज भरणार!

आम्ही येत्या शुक्रवारी (ता. २०) रोजी उमेदवारांचे अर्ज भरणार आहोत. ५० टक्के नवे चेहरे असतील काय, या प्रश्नावर मोन्सेरात म्हणाले, पक्ष त्यावर निर्णय घेणार आहे. आपण पक्षाची आज्ञा पाळणारे आहोत, पक्ष जे सांगेल ते होईल आणि आम्ही सर्व एकत्रित आहोत, असेही त्यांनी नमूद केले. पाच वर्षांत महानगरपालिकेचे कार्य पाहून पणजीतील नागरिकांनी निर्णय घ्यावा, असे आवाहनही मोन्सेरात यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com