Panaji Casino Protest: 'गोव्यातून कॅसिनो हटवा'! पणजीवासियांनी आवळली मूठ; जनआंदोलन, न्यायालयीन लढा सुरु

Panaji Casino Protest: दरम्यान, यावेळी चार ठराव मंजूर करण्यात आले असून हे ठराव उपस्थित नागरिकांच्या सह्यांनिशी सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Panaji Casino Protest
Panaji Casino ProtestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मांडवी नदीतून त्याचबरोबर राज्यातून कॅसिनोंना हटवण्याबाबत प्रसंगी रस्त्यावर आणि न्यायालयात लढा देण्याचा एकमुखी निर्णय ‘पोणजेकार अगेन्स्ट कॅसिनो‘ या संघटनेच्या मंगळवारी सायंकाळी पणजीत झालेल्या बैठकीत उपस्थितांनी घेतला.

दरम्यान, यावेळी चार ठराव मंजूर करण्यात आले असून हे ठराव उपस्थित नागरिकांच्या सह्यांनिशी सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझातील सभागृहात मंगळवारी ही बैठक झाली.

या बैठकीत सबिना मार्टिन, एलिसा, पेट्रेसिया पिंटो, सुदीप ताम्हणकर आणि स्वप्नेश शेर्लेकर यांनी मांडवीतील कॅसिनोंचा पर्यावरणावर आणि नागरिकांच्या राहणीमानावर काय परिणाम झालेला आहे, याची माहिती उपस्थितांना दिली.

Panaji Casino Protest
Panaji Casinos: "कॅसिनो मला पसंत नाहीत, पण...!" पणजी महापौरांनी मांडली रोखठोक भूमिका; समस्या सोडवण्याची मोन्सेरात यांची सरकारकडे मागणी

यावेळी मान्यवरांनी पणजीतील लोकांना कॅसिनोंमुळे काय त्रास सहन करावा लागत आहे, हे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या कार्यभारावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, ताम्हणकर यांनी केवळ ठराव करून चालणार नाहीतर प्रखर आंदोलन उभारण्याचे आणि न्यायालयीन लढा देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

Panaji Casino Protest
Deltin Casino: डेल्‍टीन कॅसिनोचा मार्ग होणार मोकळा! धारगळसह इतर गावांतील 36 हेक्‍टर जमीन ‘काडा’तून वगळणार

घेतलेले ठराव

मांडवी वा गोव्यात कुठेही नवीन अधिक लांबीच्या येऊ घातलेल्या कॅसिनो जहाजाला ताबडतोब प्रवेश थांबवावा.

मोठ्या कॅसिनो जहाजांना सामावून घेण्यासाठी नदीत खोदकाम व इतर कामे करणे थांबवावे.

राज्याला जुगाराचे ठिकाण आणि ‘पापांचे शहर'' म्हणून प्रचार करणे थांबवावे, कॅसिनो हटवण्यासाठी कालबद्ध योजना अंमलात आणावी.

कॅसिनोमध्ये काम करणाऱ्या स्थानिकांना पुनर्वसन पॅकेज द्यावे, तसेच कॅसिनो पर्यटकांना सेवा देणाऱ्या स्थानिक व्यवसायांसाठी पर्यायी महसूल मॉडेल लागू करण्यात यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com