Panaji Smart City Project Roadside Upgrade Cafe Bhosale National Theatre Area
पणजी: टी.बी. कुन्हा रस्त्यावरील कॅफे भोसले आणि नॅशनल थिएटर परिसरातील रस्ते, पादचारी मार्ग आणि नागरी सुविधांच्या उन्नतीकरणाचे काम जोरात सुरू आहे. हा प्रकल्प पणजीच्या ऐतिहासिक चौकांपैकी एका भागाचे परिवर्तन करून तो अधिक सजीव, पादचारी अनुकूल आणि शहरी सौंदर्यस्थळ बनवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला आहे. इंटिग्रेटेड पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडकडून या कामाची जलदगतीने अंमलबजावणी सुरू असून लवकरच त्याची पूर्तता केली जाणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली.
हा उपक्रम सुरक्षित रस्ते, सुधारित सार्वजनिक जागा आणि विकसित शहरी रचना यावर भर देतो आणि पणजीला स्मार्ट सिटी बनवण्याच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. प्रकल्प अंतर्गत आधुनिक शहरी डिझाईन तत्त्वे वापरून, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपत, परिसराचा संपूर्ण पुनर्विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
"या प्रकल्पामुळे पणजी शहर खरोखरच पादचारी-अनुकूल ठिकाण बनणार आहे. परिसरातील हॉटेल्स, लॉजेस आणि व्यवसायांना आवश्यक वीज, इंटरनेट, पाणीपुरवठा (Water Supply) आणि गॅस जाळे व्यवस्थित पुरवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण होत असल्यामुळे हे आधुनिक शहरी सुधारणा त्वरित प्रत्यक्षात येतील आणि शहरवासीयांसाठी अधिक चांगली नागरी सुविधा उपलब्ध होतील." हा प्रकल्प शहराच्या सौंदर्यात लक्षणीय भर घालेल, तसेच नागरिक व पर्यटकांसाठी एक सुव्यवस्थित, सुशोभित आणि आधुनिक परिसर उपलब्ध करून देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
पारेख डॉरमिटरी ते साईबाबा मंदिर (७ मीटर रुंदी) आणि चहा कॉर्नर ते टीबी कुण्हा रोड (८ मीटर रुंदी) दरम्यान पुनर्रचना.
पादचारी मार्गांचे सुधारित बांधकाम, ग्रॅनाइट फ्लोअरिंग, किनारी दगड आणि नामांकित पार्किंग जागा समाविष्ट.
कॅफे भोंसले आणि परिसरातील रस्त्यांचे दर्जात्मक सुधारणे.
७० मीटर जुनी स्टॉर्मवॉटर ड्रेनेज प्रणाली नव्याने विकसित केली जाईल.
६० मीटर नवीन आरसीसी नाले, ५ मॅनहोल्स आणि १२ घरांसाठी मलनिस्सारण जोडणी.
अंताओ डी नोरोन्हा रोड (कॅफे भोंसले) (७० मीटर) व चहा कॉर्नरजवळील रस्ता (३० मीटर) २ जानेवारी २०२५ रोजी सुरू होऊन, ३१ मार्चच्या मुदतीपूर्वीच पूर्ण.
मध्यवर्ती त्रिकोणी जागेचे काम (१५० चौरस मीटर) २ फेब्रुवारीपासून सुरू असून, वेगाने प्रगतीत.
पादचारी मार्ग आणि
सुविधा बसवण्याचे काम
याआधी १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान नियोजित होते, परंतु १ फेब्रुवारीलाच सुरू झाले.
सुशोभीकरण आणि वृक्षारोपण
१ जून २०२५ पासून सुरू होऊन ३० जूनपर्यंत पूर्ण होणार.
जल, वीज, इंटरनेट (Internet), आणि गॅस पाईपलाइनसाठी नवे चेंबर (१.२x१.२ मीटर आणि १.५x१.५ मीटर) बांधले जातील.
उच्च व कमी दाबाच्या लाईन्सच्या नवीन स्थापनेमुळे परिसरातील वीज भार क्षमता वाढणार आहे.
६-मार्गीय फ्यूज-प्रकार मिनी पिलर आणि स्ट्रीटलाइट पॅनेल बसवले जातील.
स्मार्ट स्ट्रीटलाइटिंग, लँडस्केप डिझाईन, झाडे, ट्रॅफिक सिग्नल आणि स्ट्रीट फर्निचर बसवले जात आहेत.
भविष्यातील नागरी विस्ताराला मदत करणाऱ्या जल आणि विद्युत पुरवठा संरचना अद्ययावत केल्या जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.