Smart City Panaji Work
Smart City Panaji Work Dainik Gomantak

Smart City Panaji: स्मार्ट सिटीत समस्यांचा महापूर! खोदकामामुळे वाहतुकीला ‘ब्रेक’; पार्किंगचा प्रश्न चव्हाट्यावर

Panjim Smart City: गोव्यात येणारे पर्यटक, त्याशिवाय ख्रिसमसच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या खरेदीदारांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे.
Published on

Imagine Panaji Smart City Development Limited

पणजी: गोव्यात येणारे पर्यटक, त्याशिवाय ख्रिसमसच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या खरेदीदारांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न आता चव्हाट्यावर आला आहे. कारण, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्यावतीने शहरातील उर्वरित भागात खोदकाम सुरू झाले असून, त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होत आहे.

स्मार्ट सिटी’ अंतर्गत नवीन मलनिस्सारण ​​व्यवस्थेचे काम सुरू आहे आणि यापूर्वीच्या चेंबरच्या जोडण्याचे काम सध्या केले जात आहे. शहरात सध्या दहांहून अधिक ठिकाणांवर खोदाईचे काम करण्यात आले. खोदकामामुळे प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या महत्त्वाच्या रहदारीच्या ठिकाणांमध्ये सांतिनेजमधील ताज विवांता जंक्शन आणि गोविंदा इमारतीजवळील एमजी रोडजवळील जंक्शन आणि मार्केट परिसरातील अल्फ्रान प्लाझा व्यावसायिक संकुलासमोर खोदकाम करण्यात आले आहे.

आयपीएससीडीएलच्यावतीने नेमलेल्या कंत्राटदाराने स्मार्ट रस्त्याच्या कामापूर्वी एमजी रोड, चर्च स्क्वेअर येथील मलनिस्सारण वाहिन्यांचे काम हाती घेतले आहे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षी २०२५ च्या ३१ मार्चपर्यंत करण्याची हमी आयपीएससीडीएलने केंद्र सरकारला दिली आहे.

Smart City Panaji Work
Goa Tourism: सरकारचा अहवाल खोटा? गोव्यात 50 टक्के पर्यटक कमी झाल्याचा शॅकमालकांचा दावा

वाहतूक पोलिसांची गरज

शेवटच्या आठवड्यात म्हणजे २३ ते ३१ तारखेपर्यंत नाताळाच्या सुटी आणि सरते वर्ष पाहता गोव्यात येणारे देशी पर्यटक स्वतःच्या वाहनाने येण्याचे अधिकतर आता पसंत करीत आहेत. त्यामुळे पणजीत या वाहनांचा बोजा वाढतो आणि परिणामी पार्किंगची समस्या निर्माण होत आहे.

खऱ्या अर्थाने खोदकाम सुरू झाल्याने शहरातील पार्किंग व्यवस्था किंवा वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची गरज आहे. पण वाहतूक पोलिस शहरात सध्या नजरेस पडत नाहीत, अशी स्थिती आहे. पे-पार्किंग करणाऱ्यांनाच वाहतूक व्यवस्थेचे काम पहावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com