Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: स्मार्ट सिटीवर पुन्हा हातोडा! हॉटेल व्यावसायिकांना आता आली जाग; गॅस वाहिन्यांसाठी रस्ते, पदपथांची तोडफोड

Panaji Smart City Footpaths Dug for Gas Pipeline: शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे आता डोळे उघडले असल्याने कदाचित त्यांना भूमिगत गॅस वाहिनीद्वारे मिळणाऱ्या नॅचरल गॅसची गरज भासू लागली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत तयार झालेले पदपथ फोडून गॅसवाहिन्या जोडणीचे काम केले जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यांची व पदपथांची जेवढी कामे झाली आहेत, त्यातील कोणता रस्ता आणि कोणता पदपथ आता कधी फोडला जाईल हे सांगता येणार नाही. कारण शहरातील हॉटेल व्यावसायिकांचे आता डोळे उघडले असल्याने कदाचित त्यांना भूमिगत गॅस वाहिनीद्वारे मिळणाऱ्या नॅचरल गॅसची गरज भासू लागली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत तयार झालेले पदपथ फोडून गॅसवाहिन्या जोडणीचे काम केले जात आहे.

स्मार्ट सिटीची (Smart City) कल्पनाच रस्ता किंवा पदपथ पुन्हापुन्हा फोडू नये अशी असताना अनेक ठिकाणी पुन्हा खोदकाम सुरू झाले आहे. गॅस वाहिनीच्या जोडणीसाठी एकाच बाजूने विविध वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, परंतु गॅस वाहिनी ही जमिनीत अधिक खोलीवरून गेली असल्याने त्या वाहिनीसाठी मुख्य वाहिनीला जोड देण्यासाठी प्रवाह मार्ग सोडलेला नाही. त्यामुळे मुख्य वाहिनीली गॅस वाहिनी जोडण्यासाठी स्मार्ट सिटीचे झालेले काम पुन्हा फोडावे लागत आहे.

काही आठवड्यांपूर्वी नाबार्ड बँकेच्या इमारतीजवळील पदपथ खोदकाम करून हॉटेलधारकाने गॅस वाहिनी आपल्या स्वयंपाकघरापर्यंत नेली होती. आता असाच प्रकार सध्या मध्य शहरात ओझरी येथील डॉ. पी. शिवगावकर मार्गावरील एका इमारतीच्या खालील स्मार्ट सिटीअंतर्गत पूर्ण झालेला पदपथ पुन्हा खोदण्यात आला आहे.

उशिरा सुचलेले शहाणपण

१८ जून मार्गाच्या बाजूला असणाऱ्या हॉटेलच्या (Hotel) स्वयंपाकघरासाठी पदपथाचा मध्यभाग खोदून गॅसवाहिनी स्वयंपाक घरात नेण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी-जास्त होत असतात, परंतु त्याच्या तुलनेत भूमिगत वाहिनीद्वारे येणारा नॅचरल गॅस हा परवडणारा असतो. त्यासाठी अनेक घरांतून आणि प्रकल्पांतून गॅसपुरवठा वाहिनींद्वारे होऊ लागला आहे. काही ठिकाणी मात्र ही सेवा कधी सुरू होणार याची वाट पाहिली जात आहे. मात्र, हॉटेल व कारखान्यांना हा गॅस निश्चित फायदेशीर असल्याचे आता त्याचा साक्षात्कार हॉटेल व्यावसायिकांना होऊ लागला आहे, असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT