Panaji Smart City: आमदार हॉटेल बांधण्यासाठीच आलाय का? पर्रीकरांचे आरोप; ‘स्मार्ट सिटी’वरून मोन्सेरातवर टीकेची झोड

Utpal Parrikar: पर्रीकर यांनी जोरदार टीका करत म्हटले की, कामाचा दर्जा खालावलेला आहे आणि हा रस्ता या पावसाळ्यात टिकणार नाही.
Utpal Parrikar, Panaji Smart City
Utpal Parrikar, Panaji Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ताडमाड देवस्थानजवळील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या रखडलेल्या कामावरून आमदार बाबुश मोन्सेरात यांच्यावर जोरदार टीका केली. स्वतःची केवळ हॉटेल बांधण्यासाठीच आमदार आलाय का?,अशी विचारणा करून मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या अपूर्ण कामांवर उत्पल पर्रीकर यांनी प्रश्न उपस्थित केले.

गेली चार वर्षे रस्त्याचे काम सुरू आहे. दरवर्षी मुदतवाढ मागितली जाते, परंतु काम पूर्ण होत नाही. ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मागील वर्षीही करण्यात आला होता आणि आता पुन्हा तोच दावा केला जात आहे. हे खोटे आहे, अन्यथा गेल्या वर्षी किंवा आता, दोन्ही वेळा चुकीचे बोलले गेले आहे.

पर्रीकर यांनी जोरदार टीका करत म्हटले की, कामाचा दर्जा खालावलेला आहे आणि हा रस्ता या पावसाळ्यात टिकणार नाही. स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात केवळ मी पत्रकार परिषद घेतल्यावरच मैदानात येतात आणि त्यानंतर ते ‘एमडी’ला विचारा असे पत्रकारांना सांगून आपली जबाबदारी झटकतात.

Utpal Parrikar, Panaji Smart City
Panjim News: पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पाची डेडलाईन चुकली; 'IPSCDL' चा 90% काम पूर्ण झाल्याचा दावा

कामाचे वेळापत्रक सातत्याने वाढवले जात आहे आणि अंतिम मुदत अद्याप स्पष्ट नाही. उत्पल पर्रीकर यांनी या प्रकल्पाच्या विलंबावरून संताप व्यक्त केला आणि कामाच्या निकृष्ट दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाचा उद्देश योग्यरित्या पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले.

Utpal Parrikar, Panaji Smart City
Panaji Smart City: स्मार्ट सिटीची कामे 3 दिवसांत पूर्ण होणार? 31 मार्चची मुदत; न्यायालयात हमीपत्र देऊनही कामे रखडली

प्रसंगी न्यायालयात जाऊ, प्रतिभा बोरकर

स्मार्ट सिटीची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत आणि त्यांचा दर्जाही चांगला नाही. केवळ स्मार्ट सिटीच्या संकेतस्थळावर चांगली चित्रे अपलोड केली आहेत,पण प्रत्यक्षात सदर स्थळी भेट दिली तर चित्र उलट दिसते, असा आरोप पणजी गट काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिभा बोरकर यांनी केला. दरम्यान, यापुढे दर दोन महिन्यांनी आम्ही आता ‘स्मार्ट सिटी’चा अहवाल तयार करून अधिकाऱ्यांना जाब विचारू अन् त्यांनी चूक मान्य केली नाही तर न्यायालयात जाऊ,असा इशारा बोरकर यांनी दिला. बोरकर यांनी स्मार्ट सिटी कामांतील भ्रष्टाचारावर टीका केली. उच्च न्यायालयात दिलेल्या हमीची पायमल्ली होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com