Smart City Panaji Work  Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: पणजीत वाहतुकीचा खेळखंडोबा! खोदकामांमुळे गोंधळच गोंधळ; वाहनचालक त्रस्त

Smart City Panaji Work: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत सुरू केलेल्या खोदकामामुळे गुरुवारी अचानक रस्ते बंद केल्याने शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत सुरू केलेल्या खोदकामामुळे गुरुवारी अचानक रस्ते बंद केल्याने शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. शुक्रवारी काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याने या गोंधळात आणखीनच भर पडल्याचे दिसून आले.

शहरातील वाहतुकीचा (Transportation) पूर्ण बोजवारा उडाला असून पर्यटक सोडाच पण गोमंतकीय वाहनधारक देखील रस्त्या मोकळा दिसेल तिथून वाहने हाकलत आहेत. त्यामुळे पणजीतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे.

पणजीत (Panaji) स्मार्ट सिटीअंतर्गत उत्तरभागातील उर्वरित राहिलेल्या रस्त्याचे, मलनिस्सारण चेंबर आणि मलनिस्सारण वाहिन्या जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. सध्या रस्त्याचे, पदपथाचे काम आता दुसराच कंत्राटदार करीत आहे. भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सरकारी यंत्रणा करीत आहे.

अगोदरच पणजीतील रस्ते अरुंद आहेत, त्यात रस्त्याच्या एका बाजूला खोदकाम केले तर अर्धा रस्ताच वाहतुकीसाठी वापरता येतो. सध्या गीता बेकरीपासून ते मामलेदार कार्यालयापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मांडवी किनाऱ्यावरील भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरून पणजी बाहेर पडण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना एकतर बँक ऑफ बडोदापासून वळण घेऊन पोलिस मुख्यालयाकडून किंवा १८ जून मार्गावरून चर्चच्या मागून जावे लागते. तसेच जुन्या सचिवालयाच्या मागे आझाद मैदानाकडे जाणारा रस्ता अडवला आहे.

नियोजनशून्य कामे वाहतुकीच्या मुळावर

पणजीत सध्या पर्यटक मोठ्या संख्येने उतरले असल्याने पर्यटक वाहनांचीही संख्या जास्त आहे. तसेच राज्यभरातून कामधंद्यानिमित्त लोक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे रोज हजारो वाहनांचा ताण पणजीला झेलावा लागतो. त्यात पार्किंग ही पणजीतील एक मोठी समस्या आहे. बहुतेक वाहने रस्त्यांवरच पार्क केली जातात. पार्किंगसाठी काही रस्ते आरक्षित असले तरी शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने पार्किंगला जागा अपुरी पडते. त्यात एखादा रस्ता जरी वाहतुकीस बंद ठेवला तर येथील वाहतूक प्रभावित होते. शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्यापासून येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. आता प्रमुख रस्ते बंद केल्याने त्यात अधिकच भर पडली आहे.

वाहतूक पोलिस कुठे आहेत?

गेले दोन दिवस पणजीत वाहतुकीचा मेगा गोंधळ सुरू आहे, मात्र रस्त्यांवर वाहतूक पोलिस क्वचितच दिसत आहेत. चर्चस्क्वेअर, दिवजा सर्कल आदी ठिकाणी आडोशाला उभा असलेला एखादा दुसरा वाहतूक पोलिस दिसून येतो. वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारे वाहतूक पोलिस अजूनही गायब आहेत. नव्या वर्षात पणजीतील वाहतूक पोलिस विभाग बराच सुस्तावला असल्याची चर्चा शहरात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

Goa Accident: पेडणेजवळ थरार! महिंद्रा कार खांबावर आदळली, गाडीचा चक्काचूर; नवरा-बायको गंभीर जखमी

Goa Politics: 'देवाची शपथ घेऊनसुद्धा काँग्रेसचे आमदार भाजपसोबत गेल्याचा इतिहास'! आतिषी यांची सडेतोड मुलाखत; Watch Video

Diwali 2025: दिवाळी तोंडावर तरी दुकानदार, विक्रेते चिंतेत! ‘ऑनलाईन’ खरेदीचा फटका; घोंगावतेय पावसाचे सावट

Goa Live News: पंचांना अपात्र ठरवण्याचा आदेश रद्द!

SCROLL FOR NEXT