Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Goa Seashore : तसेच या प्रकरणातील प्रतिवादीला चार लाख रुपये उच्च न्यायालयात जमा करण्यास सांगितले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Seashore :

पणजी, हणजूण समुद्रकिनाऱ्यावरील जागेची पाहणी करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करता येईल का, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश गोवा खंडपीठाने गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळाला दिले आहेत.

तसेच या प्रकरणातील प्रतिवादीला चार लाख रुपये उच्च न्यायालयात जमा करण्यास सांगितले आहे.

बुधवारी सकाळी या विषयावरील जनहित याचिकेवर सुनावणी झाली. जीटीडीसीने काही काळापूर्वी हणजूण किनाऱ्यावरील एक बेकायदा बांधकाम पाडले होते; परंतु बांधकाम पाडल्यानंतरचा मलबा वगैरे साहित्य तसेच होते.

त्यामुळे याचिकाकर्त्याने ती जागा पूर्ववत करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाने प्रतिवादीला ती जागा पूर्ववत करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली होती; परंतु समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि पावसाळ्यानंतर ती जागा पूर्ववत केली जाईल, असे सांगून दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्यात प्रतिवादी अपयशी ठरला. 

१५ मे रोजी सुनावणी

याप्रकरणी युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळाला या जागेची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी ती पूर्ववत करणे शक्य आहे की नाही, याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. तसेच प्रतिवादीला चार लाख रुपये न्यायालयात जमा करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Accident: चिंबल महामार्गावर रुग्णवाहिका उलटली; चालक, परिचारिका सुखरूप; अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा

Goa Sports: 'गोव्यातून ऑलिंपियन घडवायचाय'; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे मोठे लक्ष्य, क्रीडा शिक्षकांना संघटनांशी समन्वय साधण्याचे आवाहन

Cutbona Jetty Dengue: कुटबण जेटीवर डेंग्यूचा शिरकाव! 2 मजूर बाधित; आरोग्य खात्याकडून 2.5 हजार मजुरांची तातडीने तपासणी

Omkar Elephant: 'ओंकार' हत्तीचा 'राजेशाही' प्रवास! बांदा-डेगवे मार्ग अडीच तास ठप्प; हत्ती पुढे अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा मागे

मित्रासोबत बारमध्ये दारू पिली, नंतर खून केला अन् मोबाईल घेऊन यूपीमध्ये फरार; मित्राच्या हत्येप्रकरणी संशयिताचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

SCROLL FOR NEXT