Goa Election 2024: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Dabolim Lok Sabha Election 2024 Voting: काँग्रेस दोन्ही उमेदवार खलप आणि विरियातो यांनी भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केलाय.
Money Distributed To Police Escort in Dabolim Is Murder Of Democracy Said South Goa Gongress Candidate Viriato Fernandes
Money Distributed To Police Escort in Dabolim Is Murder Of Democracy Said South Goa Gongress Candidate Viriato FernandesDainik Gomantak

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी दाबोळीत लोकशाहीचा खून झाल्याचे म्हटले आहे. दाबोळी मतदारसंघात पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातील दोन लोकसभा जागांसाठी आज (मंगळवार) सकाळी सातपासून मतदानास सुरुवात झाली आहे.

Money Distributed To Police Escort in Dabolim Is Murder Of Democracy Said South Goa Gongress Candidate Viriato Fernandes
Goa Loksabha Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

दाबोळी मतदारसंघात पोलिस संरक्षणात पैशांचे वाटप केले जात असून, ही लोकशाहीची हत्या आहे. मतदान केंद्रावर निंबू पाणी किंवा शीतपेयांचे वाटप करण्यापेक्षा निवडणूक आयोगाने अशा लोकांना पकडायला हवं. माझ्याकडे याबाबत कागदपत्रांसह पुरावा असून, योग्यवेळी बाहेर काढणार, असे विरियातो म्हणाले.

उत्तर गोव्याचे काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांनी देखील भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला आहे. भाजप कार्यकर्ते पैसे वाटताना दिसून आल्याचे खलप म्हणाले.

आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा विजयाची ही सुरुवात असल्याचे रमाकांत खलप म्हणाले. संपूर्ण गोव्यात आम्ही अमूलाग्र बदल घलवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

गोव्यासह संपूर्ण देशासाठीचा विकास आराखडा तयार आहे, असे खलप म्हणाले. दरम्यान, भाजप कार्यकर्ते राज्यात पैसे वाटत असल्याचे आढळून आले. काँग्रेसने मात्र पैसे वाटले नाहीत, कारण काँग्रेसकडे पैसेच नाहीत, असे खलप म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com