Court Dainik Gomantak
गोवा

Dhillon Murder Case: नरोत्तम सिंग धिलॉन खून प्रकरणी 22 वर्षीय संशयित पूजाला सशर्त जामीन

Panaji Additional Sessions Court: पूजा ऊर्फ नीतू रहुजा (२२) हिला पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला. या गुन्ह्यात ती इतर संशयितांसोबत होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News: पर्वरी येथील घरात नरोत्तम सिंग धिलॉन ऊर्फ निम्स धिलॉन (७७) याचा खून करून दागिन्यांच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पूजा ऊर्फ नीतू रहुजा (२२) हिला पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला. या गुन्ह्यात ती इतर संशयितांसोबत होती. मात्र, खून करण्यासाठी तिने त्यात भाग घेतलेला नाही. तिचा हा पहिल्याच गुन्हा असल्याने तिला जामीन देताना दया दाखवण्यात येत असल्याचे निरीक्षण सत्र न्यायालयाने केले आहे.

नरोत्तम धिलॉन या वृद्धाच्या खूनप्रकरणी पर्वरी पोलिसांनी जितेंद्र साहू (३२), पूजा ऊर्फ नीतू रहुजा (२२) व कुणाल खाटीक (२४, मध्यप्रदेश) यांना अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध खून व चोरीच्या आरोपाखाली आरोपपत्रही दाखल केले आहे. याप्रकरणातील संशयित कुणाल खाटीक याला न्यायालयाने जामीन दिला आहे.

न्यायालयीन कोठडीतील संशयित पूजा रहुजा हिने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तिला जामीन मंजूर करताना वैयक्तिक ५० हजार रुपयांचा जाचमुचलका व तत्सम रकमेचे दोन साक्षीदार सादर करण्यात यावेत. त्यातील एक साक्षीदार स्थानिक तर दुसरा तिचा नातेवाईक असावा. महिन्यातून एकदा तिने तपास अधिकाऱ्यांमसोर ठरवून दिलेल्या तारखेदिवशी पोलिसांत हजेरी लावावी, अशा अटी घातल्या.

असा झाला प्रकरणाचा तपास

संशयितांनी ३ फेब्रुवारी २०२४ च्या रात्री नरोत्तम धिलॉन याचा खून करून त्यांच्या घरातील मोबाईल आयफोन, सोन्याचे कडे, सोन्याची साखळी तसेच पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन पलायन केले होते. पर्वरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावताना त्या तिघांना अटक केली होती व त्यांनी चोरलेला माल व गाडी जप्त केली होती. जितेंद्र व पूजा या दोघांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली होती. २ मे २०२४ रोजी आरोपपत्र दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इबोला संसर्गाबाबत केंद्र सरकारकडून हेल्थ ॲडव्हायझरी जारी, देशातील सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंट्सवर कडक स्क्रिनिंगचे आदेश

Goa Weather: 48 तास महत्त्वाचे! दोन दिवस कोसळणार पाऊस; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

Odisha Crime: ओडिशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना! जिल्हा रुग्णालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार; एका महिलेसह तिघे अटकेत

Manoj Parab Resign: राज्याच्या राजकारणात खळबळ! मनोज परब यांनी दिला 'आरजीपी'चा राजीनामा

Goa politics: सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; मडगाव पालिका बैठक, सरदेसाईंच्या प्रस्तावित विकासकामांवरून वाद

SCROLL FOR NEXT