Vinayak Naik Murder Case: विनायक नाईक हत्या प्रकरण उलगडले! कारवार पोलिसांनी तिन्ही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

Pune Businessman Vinayak Naik Death Case: काही दिवसांपूर्वी दोन कुटुंबांमध्ये वादावादी झाली होती. त्याची परिणती अखेर विनायक नाईक यांच्या खुनात झाली
Pune Businessman Vinayak Naik Death Case: काही दिवसांपूर्वी दोन कुटुंबांमध्ये वादावादी झाली होती. त्याची परिणती अखेर विनायक नाईक यांच्या खुनात झाली
Karwar Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Pune Businessman Vinayak Naik Karwar Murder Case

खानापूर: पुणे येथील उद्योजक विनायक नाईक यांच्या हत्येचे प्रकरण वैयक्तिक द्वेषापोटी सुपारी देऊन घडवून आणले होते, असा उलगडा कारवार जिल्हा पोलिसप्रमुख एम. नारायण यांनी आज प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केला.

याप्रकरणी तिघा मारेकऱ्यांपैकी दोघांना दिल्लीत २४ सप्टेंबर रोजी, तर अन्य एकाला २५ सप्टेंबर रोजी मडगाव (गोवा) येथे ताब्यात घेतले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मारेकऱ्यांची नावे उज्ज्यात जागीर (वय २४ वर्षे, रा. मेहंदनगर, बिहार), मासूम मंजूर पूर्णिया (बिहार) , लक्ष्य ज्योतिनाथ केनारामनाय (वय ३१ वर्षे, रा. बरुवदाल,  आसाम) अशी आहेत. रविवार, २२ सप्टेंबर रोजी सदाशिवगड पोलिस स्थानकाच्या हद्दीत हणकोण येथील विनायक ऊर्फ राजू काशिनाथ नाईक (वय ५८ वर्षे) यांच्या घरात घुसून सुरा, तलवार आणि लोखंडी रॉडने प्रहार करून अज्ञातांनी त्यांची हत्या केली होती.

गोवा पासिंगच्या कारचा वापर

नारायण म्हणाले की, मारेकऱ्यांनी हत्येचा कट पूर्णत्वाला नेण्यासाठी गोवा पासिंगच्या कारचा वापर केला. ही कार कुणाची, कुठली याचा तपास केला असता फोंडा (गोवा) येथील उद्योजक गुरुप्रसाद मधुकर राणे (मूळ बोलशिट्टा-हलगा, ता. कारवार) याने ओळखीच्या व्यक्तीकडून ती कार घेऊन मारेकऱ्यांकडे सोपविली आणि विनायक यांना संपविण्यासाठी सुपारी दिली होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार बिहार आणि आसाममधील संशयितांनी राणे यांनी सोपविलेले काम फत्ते केले.

Pune Businessman Vinayak Naik Death Case: काही दिवसांपूर्वी दोन कुटुंबांमध्ये वादावादी झाली होती. त्याची परिणती अखेर विनायक नाईक यांच्या खुनात झाली
Vinayak Naik Murder Case: धक्कादायक! पुणे उद्योजक खून प्रकरणातील गूढ वाढले; संशयित राणेचा मृतदेह सापडला मांडवी नदीत

तीन चौकशी पथकांची नियुक्ती

एम. नारायण म्हणाले की, हे प्रकरण वैयक्तिक द्वेषापोटी सुपारी देऊन घडवून आणले होते. हत्येनंतर दिल्ली गाठलेल्या दोघा मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी रेल्वे आणि दिल्ली पोलिसांची मदत घेतली, तर मडगाव येथील आरोपीला ताब्यात घेण्यात कारवार पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी तीन चौकशी पथकांची नियुक्ती केली होती.

काही दिवसांपूर्वी झाला होता वाद

काही दिवसांपूर्वी दोन कुटुंबांमध्ये वादावादी झाली होती. त्याची परिणती अखेर विनायक नाईक यांच्या खुनात झाली. या प्रकरणात आपल्यालाही अटक होणार, या भीतीने गुरुप्रसाद राणे याने आत्महत्या केली असावी, असे पाेलिसांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com