Hindu Dharma Related Program Dainik Gomantak
गोवा

धर्माला सोडून कसलेच काम करू नका: पद्मश्री स्वामी ब्रम्हेशानंद

जपानुष्ठानावेळी लोकप्रतिनिधींना उपदेश

दैनिक गोमन्तक

पणजी: जिथे धर्म आहे, तिथे जय आहे, हे लक्षात ठेवा. हिंदू धर्मासाठी काय केले याची यादी करा. त्यात काही उणीव असेल तर त्यात भर घाला. कितीही प्रतिष्ठा कमवा, मात्र धर्म नसेल तर ते सर्व बिनकामाचे. धर्माला सोडून कसलेच काम करू नये, तर धर्माला सोबत ठेवून काम करण्याची सवय आमदार, खासदार व मंत्र्यांनी ठेवावी, असा उपदेश कुंडई तपोभूमी पीठाधीश पद्मश्री सद्‍गुरू ब्रम्हेशानंद स्वामींनी केला.

कुंडई तपोभूमी येथे शनिवारी राष्ट्रसंत सद्‍गुरू ब्रम्हानंदाचार्य स्वामी पुण्यतिथी महोत्सव तथा गुरुमंत्र जपानुष्ठान कार्यक्रमात सद्‍गुरू ब्रम्हेशानंद स्वामी बोलत होते.

हिंदूंची उध्वस्त झालेली‌ मंदिरे उभारण्याच्या सरकारच्या कार्यात या पीठाधीशाचे पूर्ण सहकार्य असेल. आम्ही आमचीच मंदिरे बांधली तर दोषी धरले जाते. परकीयांनी पाडलेली मंदिरे नव्याने बांधली तर त्यात चुकीचे काय आहे व यामध्ये विघातक व फूट पाडणाऱ्या शक्तींचा प्रश्‍न येतोच कोठे, असा प्रश्‍न करत स्वामी म्हणाले की, मोडकळीस आलेली मंदिरे पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे भाष्य केले.

आपण सर्व हिंदू एक आहोत ही भूमिका अधिक बळकट करायची आहे. राज्यातील ख्रिश्‍चन व मुस्लिम हे आमचेच आहेत व कोणाचा आम्ही द्वेष करत नाही व मतभेदही करत नाही. ब्रिटिश संसदेत मला भगवा सोडून वेगळ्या वेशात येण्यास सांगितले होते मात्र ते मी मान्य केले नाही तर माझ्या पारंपरिक भगव्या वेशातच येणार असे ठामपणे सांगितले. त्यामुळे प्रत्येकाने हिंदू धर्माचे आचरण करताना कोणताही भेदभाव ठेवू नका, असा उपदेश त्यांनी केला.

राष्ट्रसंत सद्‍गुरू ब्रम्हानंदाचार्य स्वामी पुण्यतिथी महोत्सव तथा गुरुमंत्र जपानुष्ठान कार्यक्रमावेळी पीठाधीश पद्मश्री सद्‍गुरू ब्रम्हेशानंद स्वामींचे हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, वीजमंत्री निलेश काब्राल, आमदार विजय सरदेसाई, मंत्री सुभाष फळदेसाई, सभापती रमेश तवडकर, आमदार वीरेश बोरकर, आमदार दाजी साळकर, आमदार केदार नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रेमेंद्र शेट, जीत आरोलकर आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेले स्वामी प्रियम यांचाही सद्‍गुरु स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आध्यात्मिक पर्यटन वाढावे: मुख्यमंत्री

गोव्याची ओळख ही आता फक्त सूर्य, वाळू व किनारे एवढ्या पुरतीच मर्यादित राहू नये. आध्यात्मिक, सांस्कृतिक पर्यटनासाठीही गोव्यामध्ये लोक-पर्यटकांनी येण्याची गरज आहे.आध्यात्मिक पर्यटन वाढायला हवे. धर्म व देश याचा प्रचार गुरु परंपरेनुसार सध्या विविध पीठांकडून सुरू आहे. कुंडई तपोभूमी पीठाधीश पद्मश्री ब्रम्हेशानंद स्वामी यांना देशाबाहेरही निमंत्रित केले जात आहे. तसेच ते तेथे जाऊन धर्माचे प्रचारकार्य अगत्याने करत आहेत, ही गोमंतकियांसाठी अभिमानाची बाब आहे, असे मत यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलताना व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT