गोव्यातील कला अकादमीचे नूतनीकरण अंधारात ठेवून....

चार्ल्स कुरैया फाऊंडेशन: मूळ वास्‍तूचे सौंदर्यीकरण कायम ठेवण्‍याची मागणी
Goa Kala Academy
Goa Kala Academy Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कला अकादमीच्या ऐतिहासिक वास्तूचे नूतनीकरण करताना तिथे प्रत्यक्षात काय चालले आहे हे पाहण्यास ना चार्ल्स कुरैया फाऊंडेशनला (सीसीएफ) अनुमती, ना लोकांना. हे काम आम्हाला अंधारात ठेवून केले जात आहे. या वास्तूचे मूळ सौंदर्य बिघडता कामा नये, अशी तीव्र प्रतिक्रिया चार्ल्स कुरैया फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त आर्मिनिओ रिबेरो यांनी सीसीएफ स्टुडिओत बोलविलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी सीसीएफच्या संचालक नंदिता कुरैय्‍या मेहरोत्रा (चार्ल्स यांच्या कन्या), निमंत्रक ताहिर नोरोन्हा उपस्थित होते.

Goa Kala Academy
विश्‍‍वजीत राणे देणार ‘त्‍या’ महिलेला घर बांधून

आर्मिनिओ यांनी कला अकादमीच्य आधीच्या वास्तूचे नूतनीकरण करताना त्यात फेरफार तर केला जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली. ते म्हणाले की, आतापर्यंत कला अकादमीचे दुरुस्तीकरण झालेले दिसत नाही. अंतर्गत नूतनीकरण व थिएटर डिझाईनबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कला अकादमीचा कुठलाही भाग तोडता कामा नये, फक्त दुरुस्त करता येईल असे स्पष्ट आहे.

नंदिता कुरैया मेहरोत्रा म्हणाल्या, बहुतेक वास्तूशास्त्रीय प्रकल्पात काही दुरुस्ती करायची असल्यास मूळ रचनाकाराशी सल्लामसलत केली जाते. गुजरात सरकारने सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमची दुरुस्ती करताना आमच्याशी (सीसीएफ) सल्लामसलत केली होती. येथेही तेच अपेक्षित आहे.

Goa Kala Academy
पश्चिम बगलरस्त्याला आता सुरावली ग्रामस्थांचा विरोध

पिल्लईंच्‍या अहवालाचे स्‍मरण

जानेवारी 2020 मध्ये आयआयटी (मद्रास) येथील प्रो. आर. जी. पिल्लई यांना सीसीएफने कला अकादमीच्या तपासणीसाठी बोलाविले होते व त्यांनी ही वास्तू पाडण्याची गरज नाही, मूळ स्वरुपात दुरुस्त करता येईल असा सरकारला अहवाल दिला होता. कामाच्या दर्जाशी तडजोड करून चालणार नाही असेही म्हटले होते याचे स्मरण यावेळी करून देण्‍यात आले. ऑगस्टमध्ये ही वास्तू दुरुस्त होऊन कलाकार व रसिकांसाठी खुली होण्याची शक्यता आर्मिनिओ यांनी फेटाळून लावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com