सासष्टी: गेल्या अनेक वर्षांपासून पश्र्चिम बगलमार्ग पूर्ण होण्यासंदर्भात अनेक समस्या निर्माण होत असतानाच आता सेरावली ग्रामस्थांच्या विरोधामुळे त्यात आणखी भर पडली आहे. 2007 साली या रस्त्याचा आराखडा सुरू करण्याचे काम सुरु झाले होते. मात्र 15 वर्षांनंतरही तो पूर्ण होऊ शकलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात आज सुरावली भागातील नागरिक एकत्र आले व त्यांनी बाणावलीकरांच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला. शिवाय मुंगूल, बेताळभाटी या गावातील लोकांनीही एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन केले.
सदर रस्ता मुंगूल येथे घाऊक मासळी मार्केटपर्यंत पूर्ण झालेला आहे. पुढचा नावेलीपर्यंतचा भाग पूर्ण होण्यास विलंब होत आहे. त्यापुढील भागातील रस्ता शेतजमीन व साळ नदीच्या तीरावरुन जातो. सरकारने शेतात मातीचा भराव टाकून रस्ता पूर्ण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे लोकांच्या शेतीवर परिणाम होणार आहे. पावसाळ्यात पाणी साचून पुराची तसेच पाणी घरात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बाणावलीच्या नागरिकांना हा 2.75 किमी अंतराचा रस्ता स्टिल्टवर बांधावा अशी मागणी केली आहे.
सदर रस्ता चाररस्ता जंक्शनपर्यंत येणार आहे. रस्त्याच्या मधोमध एक छोटासा तलाव आहे. तोसुद्धा बुजविण्यात येत आहे. रस्ता शेतातून गेल्यास शेती नष्ट होईल. काळी मातीही आणली आहे. ती नेमकी कशासाठी हे कळायला मार्ग नाही. आमचा बाणावलीकरांना पूर्ण पाठिंबा असेल.
- विन्स्टन फर्नांडिस,
साळ नदीचे पाणी वेर्णा, सेरावली, मडगावहून थेट बाणावलीला पोचते. जर बाणावलीत पाण्याचा प्रवाह बंद केला तर शेतकऱ्यांना नुकसानी सोसावे लागेल. आम्ही सरकारला या गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. रस्ता स्टिल्टवर बांधण्यासाठी केंद्र सरकारही मदत करेल.
- केविन डिसोझा, सुरावलीचे पंचसदस्य
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.