OTP Banking Fraud Dainik Gomantak
गोवा

OTP Banking Fraud: 'ओटीपी' शेअर केला अन् 80 हजार 855 रुपये गेले; बँकेविरोधातील ग्राहकाची तक्रार आयोगाने फेटाळली

OTP Fraud Customer Responsibility: आयोगाने कोटक महिंद्रा बँक आणि पेटीएमविरोधात दाखल केलेली ग्राहकाची तक्रार फेटाळून लावली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बँकिंग तपशील आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) यांसारखी गोपनीय माहिती स्वतः शेअर केल्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्यास त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल दक्षिण गोवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला. आयोगाने कोटक महिंद्रा बँक आणि पेटीएमविरोधात दाखल केलेली ग्राहकाची तक्रार फेटाळून लावली.

अँथनी फर्नांडिस यांचे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कोटक महिंद्रा बँकेत बचत खाते आहे. १४ जून २०२२ रोजी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ८० हजार ८५५ रुपयांचा संशयास्पद व्यवहार होऊन ही रक्कम पेटीएम, नोएडा येथे वर्ग झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या व्यवहाराबाबत त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधून कार्ड तसेच बँकिंग सेवा बंद करण्याची विनंती केली होती. तसेच वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

बेला नाईक आणि सदस्य नेली परेरा डिसिल्वा यांनी सादर पुरावे व युक्तिवाद विचारात घेत तक्रारदाराला व्यवहार अनधिकृत असल्याचे सिद्ध करता आले नसल्याचे नमूद केले. गोपनीय माहितीशिवाय व्यवहार होणे शक्य नसल्याने बँकेच्या सेवेत त्रुटी असल्याचा दावा आयोगाने फेटाळला.

केवळ मध्यस्थ!

‘पेटीएम’तर्फे ॲड. वेदराज तोरस्कर यांनी कंपनी केवळ मध्यस्थ व्यासपीठ असून माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ७९ अंतर्गत तिला संरक्षण असल्याचा युक्तिवाद केला. तक्रारदारातर्फे ॲड. सुधीर नाईक, तर बँकेतर्फे ॲड. इंद्रबहादूर पासी यांनी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT