Goa Politics: 'भाजपला हरवायचा प्लॅन काय?' काँग्रेसने स्पष्ट करावे; 'आप'चे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक यांचा थेट सवाल

AAP Congress Alliance Goa: एकाबाजूने काँग्रेस पक्ष आपकडे युती करण्‍याच्‍या गाेष्‍टी करून काँग्रेसची दारे ‘आप’साठी खुली आहेत असे म्‍हणतो.
Goa election 2027 AAP Congress
Goa Assembly Election 2027Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: एकाबाजूने काँग्रेस पक्ष आपकडे युती करण्‍याच्‍या गाेष्‍टी करून काँग्रेसची दारे ‘आप’साठी खुली आहेत असे म्‍हणतो. मात्र दुसऱ्याबाजूने अजूनही आम्‍हाला काँग्रेसकडून अधिकृतरीत्‍या प्रस्‍ताव येत नाही. हे पाहिल्‍यास काँग्रेसला ‘आप’ची खरेच गरज आहे का, की आम्‍ही त्‍यांना नको आहाेत, हेच आम्‍हाला कळत नाही, अशी प्रतिक्रिया ‘आप’चे गोवा अध्‍यक्ष वाल्‍मिकी नायक यांनी व्‍यक्‍त केली.

एका स्‍थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत नायक यांनी काँग्रेसच्‍या एकंदर कारभारावर शंका व्‍यक्‍त करताना, काँग्रेसला खरेच भाजपाला हरवायचे आहे का, असा सवाल केला. मुख्‍यमंत्र्यांच्‍या विरोधात त्‍यांचा उमेदवार कोण असणार. वाळपईमध्‍ये ते कुणाला उमेदवारी देणार याबद्दल काहीच बोलत नाहीत. भाजपला हरविण्‍यासाठी त्‍यांचा नेमका प्‍लॅन काय हे त्‍यांनी आधी स्‍पष्‍ट करावे, असे म्‍हटले.

Goa election 2027 AAP Congress
Goa Business Regulations: उद्योगांसाठी नियम सुलभ करणाऱ्या कायद्याला राज्यपालांची मंजुरी; परवानग्या, अनुपालन प्रक्रिया होणार सोपी

एकीकडे काँग्रेस नेते आपला युतीसाठी दारे खुली आहेत, असे म्‍हणतात तर दुसरीकडे बाणावलीत काँग्रेस उमेदवार उभा करण्‍याच्‍या गोष्‍टी करतात. अशात युती होणार, कशी असा सवाल करीत सुरुवातीला ‘आप’ने सर्व पक्षांशी युती करण्‍याचा पर्याय खुला असल्‍याचे म्‍हटले होते.

त्‍याउलट गोवा फॉरवर्डने ‘आप’चा प्रस्‍ताव तत्‍काळ मान्‍य केला. त्‍यामुळे फॉरवर्ड-आप युती तुटणार ही केवळ अफवा आहे, असे ते म्‍हणाले. दरम्‍यान,‘आप’चे कार्यकारी अध्‍यक्ष जर्सन गोम्‍स यांनी काँग्रेसचे नेते फक्‍त फोनवर बोलतात, पण प्रत्‍यक्ष चर्चेचा प्रस्‍ताव दिल्‍यास तो मान्‍य करत नाहीत,असे सांगितले.

Goa election 2027 AAP Congress
Goa Politics: गोवा फॉरवर्डचा काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव कुठे अडकला? अमित पाटकरांचा सवाल; 'के. सी. वेणुगोपाल यांनी उत्तर द्यावे'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

AAP Attacks Congress
Goa Rakshan Yatra
Goa Congress Core Committee
Girish Chodankar Congress Alliance
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com