Goa Protected Monuments: गोव्यातील 15 प्राचीन स्मारकांना संरक्षित स्थळांचा दर्जा; हात कातरो खांब, मर्दनगड किल्ल्यासह ऐतिहासिक वास्तूंचा समावेश

Goa Protected Monuments Protected List: राज्य सरकारने गोव्यातील १५ प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळांना संरक्षित स्थळांचा दर्जा दिला आहे.
Goa Protected Monuments
Goa Protected MonumentsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्य सरकारने गोव्यातील १५ प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळांना संरक्षित स्थळांचा दर्जा दिला आहे. गोवा प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळे व अवशेष कायदा, १९७८ अंतर्गत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

संरक्षित करण्यात आलेल्या स्थळांमध्ये मळार गुहा, जुने गोवे येथील हात कात्रो खांब अर्थात पेलोरिन्हो नोव्हो, शिरदोन गुहा, चिंबल येथील अवर लेडी ऑफ माउंट कार्मेल मठाचे अवशेष, गोवा वेल्हा येथील गोपकापट्टण बंदराचे अवशेष, नेत्रावळी येथील जॅकुम गुहा, पिर्ला येथील बावल्याचे मळ, बाळ्ळी मठ, कोर्डेम येथील सासोरे खड्डेम मंदिराचे अवशेष, खांडोळा येथील तामसुळी गुहा, कुळे येथील मर्दनगड किल्ला, कुडणे येथील सूर्य मंदिराचे अवशेष व स्मारके, दाबोळी येथील कातळात कोरलेली पाण्याची टाकी आणि फातोर्डा येथील श्री दामोदर मंदिराची टाकी यांचा समावेश आहे.

Goa Protected Monuments
Goa Politics: 'भाजपला हरवायचा प्लॅन काय?' काँग्रेसने स्पष्ट करावे; 'आप'चे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक यांचा थेट सवाल

या १५ स्थळांपैकी १० स्थळे खासगी मालकीच्या जमिनीवर आहेत. त्यामुळे या स्थळांना संरक्षणाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचे जतन, देखभाल आणि पुरातत्त्वीय महत्त्व अबाधित ठेवण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com