IFFI Opening Ceremony Dainik Gomantak
गोवा

IFFI Opening Ceremony: 'गोव्याला फिल्म हब बनविण्यासाठी प्रयत्न', कलाकारांच्या उपस्थितीत इफ्फीचे दिमाखात उद्घाटन

इफ्फीत पहिल्यांदाच बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले.

Pramod Yadav

IFFI Opening Ceremony: गोव्याला फिल्म हब बनविण्यासाठी काम करत आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. तर, येत्या 2047 पर्यंत इफ्फीला जगातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव बनविण्यासाठी प्रयत्न करुया, असे अनुराग ठाकूर म्हणाले. बाम्बोळीतील श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 54 व्या इफ्फीचा उद्घाटन समारंभ पार पडला.

यावेळी इफ्फीत पहिल्यांदाच बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देण्यात आले.

उद्घाटन समारंभाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री, डॉ एल मुरुगन, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार दिलायला लोबो, सनी देओल, यासह व विविध कलाकार आणि दिग्दर्शक, लेखक आणि सिनेप्रेमी उपस्थित होते.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत काय म्हणाले?

"इफ्फी मागील काही वर्षापासून एक अनोखा आणि प्रसिद्ध चित्रपट महोत्सव म्हणून उदयास आला आहे. सिनेमा फक्त मनोरंजनाचे साधन नाही तर ते जीवनाचे चित्रण असून, चित्रपट नागरिकांच्या विचार आणि मान्यतेच्या कक्षा रुंदावतात."

"गोवा 2004 पासून इफ्फीचे यशस्वी आयोजन करत आहे. यावर्षी गोवन् विभाग सुरु केला असून, या कोकणी चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

विवाहासाठी फेवरेट स्थळ ते क्रीडा आयोजन आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रात गोवा उत्तम कामगिरी करत आहे. येत्या काळात विविध कार्यक्रमांसाठी यजमान म्हणून गोवा उदयास येईल अशी खात्री मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केली.

गोवा सिनेक्षेत्रात हळूहळू प्रगती करत आहे, राज्यात फिल्मसिटी उभारण्यासाठी गोवा मनोरंजन संस्था इच्छुक आहे. फिल्मसिटीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे," अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

मंत्री अनुराग ठाकूर काय म्हणाले?

भारतीय सांस्कृतिक ठसा फक्त भारतात नव्हे तर दक्षिण आशिया आणि इतर भागात पाहायला मिळतो. मिडिया आणि मनोरंजन क्षेत्रात भारत पाचव्या स्थानी आहे. येत्या वर्षात भारत मनोरंजन क्षेत्रात तिसऱ्या स्थानी पाहायला मिळेल, अशी ग्वाही अनुराग ठाकूर यांनी दिली.

येत्या 2047 पर्यंत इफ्फीला जगातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव बनविण्यासाठी प्रयत्न करुया, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

कार्यक्रमात विविध ज्युरी मेम्बरची ओळख आणि सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पुढे माधुरी दीक्षित, शाहिद कपूर यासह विविध कलाकरांचे नृत्य सादरीकरण पाहायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT