गोव्यात आयोजित 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) "कॅचिंग डस्ट" या चित्रपटाने प्रारंभ झाला. चित्रपटाचे आकर्षक कथानक, दृश्य कलात्मकता यातून एक विलक्षण प्रवास दाखवण्यात आला असून, चित्रपटाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री, डॉ एल मुरुगन यांनी या चित्रपटातील कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा सत्कार केला.
स्टुअर्ट गॅट दिग्दर्शित, या चित्रपटात एरिन मोरियार्टी, जय कोर्टनी, दिना शिहाबी, रायन कॉर, जोसे अल्टिट, गॅरी फॅनिन आणि ओल्वेन फ्युरे यांंनी अभिनय केला आहे. मिश्र आशियाई संस्कृतीचा वारसा लाभलेले दिग्दर्शक स्टुअर्ट गॅट हे पुरस्कार-विजेते ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आहेत. स्टुअर्ट ज्यांच्या चित्रपटाचे कथानक बर्याचदा सामाजिक विषयांवर प्रभाव टाकणारे असते.
असे आहे चित्रपटाचे कथानक
96 मिनिटांच्या या चित्रपटाचे कथानक टेक्सासच्या बिग बेंडच्या दुर्गम वाळवंटातील आहे. यात एकाकी आणि दबून जगणारी जीना आणि तिचा गुन्हेगार प्रवृत्तीचा नवरा क्लॉइड अनिच्छेने एकमेकांसोबत या राहात असतात. पतीच्या वर्तनामुळे वैतागलेली जीना निघून जाण्याचा निर्णय घेते, तेव्हा अचानक न्यूयॉर्कमधून एक दाम्पत्य तेथे येते.
या दांपत्याने तिथल्या उद्भवणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांना तिथे राहू देण्यासाठी क्लॉइडला पटवून देते. स्पष्ट निराशा आणि हताश मानसिकतेचा सामना करताना निराशेच्या पलीकडील समाधान शोधण्याच्या खोलवरच्या पातळीवर हा चित्रपट प्रेक्षकांना मोहित करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.