Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण अपघात; कंटनेरच्या धडकेत एकजण जागीच ठार!

Verna Industrial Estate: वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी (ता. ३) रात्री एक कंटेनर तेथील तीन वाहनांना धडकल्यावर रस्त्याच्या बाजूला कोसळल्याने चालक अल्ताफ बशीर पठाण हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला.

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को: वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी (ता. ३) रात्री एक कंटेनर तेथील तीन वाहनांना धडकल्यावर रस्त्याच्या बाजूला कोसळल्याने चालक अल्ताफ बशीर पठाण हा गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आनंद गावकर पुढील तपास करीत आहेत.

मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान अल्ताफ हा वेर्णा औद्योगिक वसाहतीमध्ये कंटेनर ट्रक ( एनएल- ०१-एजी- ०४२०) घेऊन आला होता. या वसाहतीतील मार्कसन कंपनीकडून लुपिन कंपनीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या डाव्या बाजूला कंटेनर ट्रक उभा करण्याचा प्रयत्न त्याने केला. त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर ट्रक उजव्या बाजूला गेला.

तेथे रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या स्कॉर्पियो कार, दोन आयशर ट्रक या वाहनांना त्या कंटेनरची धडक बसली. त्यानंतर कंटेनर ट्रक तसाच पुढे जात रस्त्यालगतच्या घळीत कोसळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT